MET GALA 2025: न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'मेट गाला २०२५' सोहळ्यात जगभरातील अनेक तारे तारकांनी हजेरी लावली. भारतातून शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ, मनीष मल्होत्रा, ईशा अंबानी हे सेलिब्रिटी पोहोचले. प्रत्येकाच्याच लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान किंग खानच्या (Shahrukh Khan) एन्ट्रीवर चाहते फिदा झाले. ब्लॅक आऊटफिटमध्ये त्याने लक्ष वेधून घेतलं. शाहरुखचे चाहते जगभर असले तरी मेट गालामध्ये मात्र परदेशी मीडियाने त्याला ओळखलंच नाही.
ब्लॅक आऊटफिट, गळ्यात K चं लॉकेट, गोल्डन ज्वेलरी, काळा गॉगल आणि हातात काळी छडी अशा लूकमध्ये शाहरुख खानने मेट गालाच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. या लूकमध्ये तो डॅशिंग आणि एकदम स्टायलिश दिसत होता. मीडियासमोर त्याने पोज दिली. सर्वांना हात दाखवत अभिवादन केलं. दरम्यान मीडियासमोर येताच एका पत्रकाराने शाहरुख सर्वांना 'हॅलो' म्हणाला. तेव्हा पत्रकारांनी त्याला नाव विचारलं. यावर तो उत्तर देत 'आय अॅम शाहरुख...' असं म्हणतो. त्याला डिझायनरचं नाव विचारताच तो सब्यसाची मुखर्जी सांगतो.
तर आणखी एक व्हिडिओत सब्यसाची शाहरुखबद्दल म्हणाले, "शाहरुख हा जगातला सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्याचा चाहतावर्ग भलामोठा आहे. आताच हॉटेलबाहेर त्याला बघण्यासाठी वेड्यासारखी गर्दी झाली. जेव्हा अशी व्यक्तीसाठी डिझाईन करण्याची संधी मिळेते आणि तेही ब्लॅक थीममध्ये तेव्हा ही खूप मोठी गोष्ट असते. आम्हाला शाहरुखला शाहरुख खान म्हणूनच दाखवायचं होतं."
शाहरुख खानची मेट गालामध्ये हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ होती. तसंच दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणीनेही पहिल्यांदाच सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. सर्वांच्याच लूक्सची भारतीय चाहत्यांकडून स्तुती होत आहे.