बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या राहुल विनोद व्होरा याने 'शार्क टँक इंडिया सीझन ५' च्या पहिल्याच भागात इतिहास रचला आहे. राहुल आणि त्याच्या 'द क्रॉफल गाईज' (The Croffle Guys) या टीमने आपल्या अनोख्या स्टार्टअप कल्पनेने शार्क्सना प्रभावित करत २.५ कोटी रुपयांचा निधी पदरात पाडून घेतला आहे.
राहुल व्होरा याने आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, त्याने बॉलिवूडमध्ये ९ वर्षे कबीर खान यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. इतकेच नाही तर, शाहरुख खानसोबत त्याने दुबई टुरिझमच्या एका मोठ्या जाहिरातीत काम केले होते. कबीर खान त्याचे मार्गदर्शक होते आणि 'माय मेलबर्न' नावाचा चित्रपट त्याने सह-दिग्दर्शितही केला होता. मात्र, लग्नानंतर त्याने आयुष्यात स्थिर होण्यासाठी आणि स्वतःचा काहीतरी वेगळा ब्रँड निर्माण करण्यासाठी चित्रपट सृष्टी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
काय आहे 'द क्रॉफल गाईज'?राहुल व्होरा, अन्नया अग्रवाल, अमेय ठक्कर आणि वीर पिंटो या चार मित्रांनी मिळून 'क्रॉफल' (क्रॉसाँ आणि वॅफल यांचे मिश्रण) हे उत्पादन बाजारात आणले. त्यांच्या याची चव आणि व्यवसायाचे मॉडेल 'शार्क टँक'च्या पॅनेलला इतके आवडले की, १०० कोटी रुपयांच्या व्हॅल्यूएशनवर त्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली.
राहुल म्हणतो, "कबीर खान माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. मी त्यांच्याकडे इंटर्न म्हणून कामाला लागलो आणि सहयोगी दिग्दर्शकापर्यंत पोहोचलो. चित्रपट सृष्टी सोडणे सोपे नव्हते, पण थायलंडच्या एका सहलीने माझे विचार बदलले आणि मला 'क्रॉफल'ची कल्पना सुचली. आज शार्क टँकमध्ये मिळालेला प्रतिसाद हा देवाचा आशीर्वादच आहे".
Web Summary : Ex-filmmaker Rahul Vora's 'The Croffle Guys' secured ₹2.5 crore funding on Shark Tank India. After leaving Bollywood, where he worked with Kabir Khan and Shah Rukh Khan, Vora pursued his unique food venture, combining croissants and waffles. The sharks invested valuing the company at ₹100 crore.
Web Summary : फिल्म निर्माता राहुल वोरा के 'द क्रॉफ़ल गाइज' को शार्क टैंक इंडिया पर ₹2.5 करोड़ की फंडिंग मिली। कबीर खान और शाहरुख खान के साथ काम करने के बाद, वोरा ने क्रोइसैन और वफ़ल को मिलाकर एक अनोखा खाद्य उद्यम शुरू किया। शार्क्स ने ₹100 करोड़ के मूल्यांकन पर निवेश किया।