Join us

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 18:49 IST

शाहिदने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘कबीर सिंग’ आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं.

शाहिद कपूर आता सध्या एका प्रसिद्ध आणि बिगबजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा बिग बजेट चित्रपट म्हणजे सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक होय. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरची प्रमुख भूमिका आहे. शाहिदने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘कबीर सिंग’ आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. रिमेकचं दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत.

ट्विटरवर पोस्ट शेअर करत शाहिदने कॅप्शनमध्ये ‘आपल्या आतील कबीर सिंगला शोधण्याचे आवाहन केले आहे.’ हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षापासून शाहिदनं ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. मुंबई-दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.

‘कबीर सिंग’मध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. ‘एम.एस. धोनी’, ‘लस्ट स्टोरी’ मध्ये कियाराने काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूर