Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरच्या हात धुवून मागे लागली होती ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी! अनेक वर्षांपासून आहे इंडस्ट्रीतून गायब!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 10:51 IST

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांचे ग्रॅण्ड लॉन्चिंग झाले. पण पुढे ते फार कमाल दाखवू शकले नाहीत. पहिलाचं ...

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांचे ग्रॅण्ड लॉन्चिंग झाले. पण पुढे ते फार कमाल दाखवू शकले नाहीत. पहिलाचं चित्रपट फ्लॉप झाल्याने अनेक स्टारकिड्स पुन्हा इंडस्ट्रीत दिसलेचं नाही. काहींना मात्र पहिला चित्रपट आपटल्यानंतरही इंडस्ट्रीचा मोह सोडवला नाही. मग त्यांनी या ना त्या मार्गाने येथे टिकून राहण्याचे प्रयत्न करून पाहिलेत. असेच काही कारनामे करणारी एक अभिनेत्री म्हणजे वास्तविकता पंडित. या वास्तविकताची दुसरी ओळख म्हणजे, ती सुप्रसिद्ध अभिनेता राज कुमार यांची मुलगी आहे.२०१२ साली या वास्तविकताविरोधात शाहिद कपूरने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि ती अचानक चर्चेत आली. वास्तविकताने १९९६ साली  बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण सुमारे दशकभर संघर्ष करूनही तिला यश मिळाले नाही. पित्याच्या स्टारडमचाही तिला कुठलाही फायदा झाला नाही. आपण पित्यासारखे बनू शकलो नाही, याची खंत कुठे ना कुठे तिच्या मनात असावी. कदाचित म्हणून सवंग लोकप्रीयता मिळवण्याचा एक प्रयत्न तिने केला असावा.होय, शाहिद कपूरच्या मागे ती इतकी हात धुवून मागे पडली होती की, सगळेच अचंबित झाले होते. शाहिद जिथे कुठे जायचा वास्तविकता त्याला फॉलो करायची. इतकेच नाही शाहिद घराबाहेर पडला रे पडला की, ती त्याचा मार्ग रोखून धरायची. मी तुझी खूप मोठी चाहती आहे, असे काय काय ती बोलायची. पण खरी गोष्ट काही वेगळीच होती. वास्तविकता मनातल्या मनात शाहिदवर प्रेम करू लागली होती आणि कसेही करून शाहिदला मिळवणे या इरेला ती पेटली होती. शाहिदच्या अधिक जवळ येण्यासाठी तिने शाहिदच्या घराजवळ फ्लॅटही घेतला होता. केवळ इतकेच नाही तर मी शाहिदची पत्नी आहे, असे लोकांना ती सांगू लागली होती. आधी शाहिदने त्याकडे दुर्लक्ष केले. पण पाणी डोक्यावरून वाहू लागले म्हटल्यावर त्यालाही वास्तविकताविरोधात कडक पाऊल उचलावे लागले.वास्तविकता कुठल्याही मानसिक आजाराने ग्रस्त नव्हती. पण तिचे हे वागणे सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. अनेकांच्या मते, एकापाठोपाठ एक चित्रपट फलॉप झाल्याने तिच्या मनावर परिणाम झाला होता. वास्तविकताचा पहिला चित्रपट अपयशी ठरल्यानंती दिग्दर्शक लॉरेन्स डिसूजाने २००० मध्ये ‘दिल भी क्या चीज है’ या चित्रपटासाठी तिला साईन केले होते.  यात तिच्या अपोझिट अर्जुन बाजवा होता. पण ऐनवेळी बाजवांनी तिला रिप्लेस केले. वास्तविकताला अभिनयचं कळत नाही, असे बाजवांचे मत होते. ती केवळ राजकुमार यांची मुलगी आहे, म्हणून मी तिला साईन केले होते, असे ते म्हणाले होते. याने वास्तविकता दु:खी होती. सध्या वास्तविकता कुठे आहे, कशी आहे, हे कुणालाही ठाऊक नाही.ALSO READ : राजकुमार यांनी दिग्दर्शकासमोर कुत्र्याला विचारून चित्रपटाला दिला होता नकार!