Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद आणि मीरा कपूर यांनी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 10:26 IST

बॉलिवूडचा चॉकेलट बॉय म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूर नेहमीच चर्चेत असतो.

बॉलिवूडचा चॉकेलट बॉय म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूर नेहमीच चर्चेत असतो. आतापर्यंत शाहिदने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहिदने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाहिद त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असण्यासोबत लग्झरी लाईफस्टाइलमुळेदेखील चर्चेत असतो. नुकतंच शाहिद आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी मुंबईत आलिशान घर खरेदी केल्याचं समोर आलं आहे.  

 IndexTap.com च्या रिपोर्ट्नुसार, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी मुंबईच्या वरळी भागातील ओबेरॉय 360 वेस्टमध्ये आलिशान अपार्टमेंट विकत घेतलं आहे.  हे अपार्टमेंट 5,395 चौरस फूट आहे. विशेष म्हणजे यात तीन पार्किंगसाठीच्या जागा देखील आहेत. 24 मे 2024 रोजी या घराचा संपूर्ण व्यवहार झाल्याची माहिती आहे. 

शाहिद-मीराने हे घर चंदक रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून विकत घेतले आहे. शाहिदच्या या घराची किंमत 59 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे. शाहिद कपूर आणि मीरा कपूर एका आलिशान घराचे मालक झाले आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूरच्या मुंबईत आणि दिल्लीत अनेक प्रॉपर्टी आहेत. तो जुहूमध्ये समुद्राजवळील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. 

मीरा आणि शाहिदने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी सातत्याने या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. दोघेही एकमेंकाना कायम सपोर्ट करताना दिसून येतात.  शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच त्याचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमा प्रदर्शित झाला होता. तर याआधी तो वेब सीरिज फर्जीमध्ये दिसला होता. यानंतर तो लवकरच देवा' सिनेमाच्या माध्यमाातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडमुंबई