शाहरूख का पडला उदय चोप्रावर भारी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 12:59 IST
‘मोहब्बते’ चित्रपट येऊन जवळपास १६ वर्षे झालीत. पण कदाचित शाहरूख खानने अद्यापही उदय चोप्राला शिकवणे सोडलेले नाही. अर्थात शाहरूख ...
शाहरूख का पडला उदय चोप्रावर भारी!!
‘मोहब्बते’ चित्रपट येऊन जवळपास १६ वर्षे झालीत. पण कदाचित शाहरूख खानने अद्यापही उदय चोप्राला शिकवणे सोडलेले नाही. अर्थात शाहरूख उदयला अॅक्टिंग वा म्युझिक शिकवत नाहीय. तर हा ‘मामला’ थोडा वेगळा आहे. होय, शाहरूख व उदय एक वर्ड गेम खेळत आहेत. तोही असा की, तुम्ही-आम्ही विनाडिक्शनरी या दोघांतील संभाषण वाचण्याचा प्रयत्न केलाच तर तुमच्या-आमच्या टाळक्यात काहीही शिरायचे नाही. हा वर्ड गेम सुरु झाला काल रात्री एक वाजता. मध्यरात्री १ च्या सुमारास उदय चोप्राने एक twee केले. उदयचे हे twee शाहरूखने पाहिले आणि तोही मैदानात उतरला. त्याने उदयच्या tweetला उत्तर दिले. आता शाहरूखचे उत्तर म्हटल्यावर उदयच्या अंगातही उत्साह संचारला. त्याने पुन्हा एकदा twee केले. पहिल्या tweeमध्ये उदयने इंग्रजीचा फारसा प्रचलित नसलेला शब्द वापरला होता. दुस-या tweeमध्येही त्याने आणखी एक असाच नवा इंग्रजी शब्द वापरला. पण इथेच शाहरूख त्याच्यावर भारी पडला. होय, उदयच्या या दुस-या tweeचा अर्थ स्पष्ट होता. तो म्हणजे, शाहरूखच्या tweeचा नेमका अर्थच त्याला कळलेला नव्हता. त्यामुळे शाहरूखने आणखी एक twee केले. विशेष म्हणजे त्यात दोन नवे शब्द होते. शाहरूखने जे लिहिले ते पुन्हा एकदा उदयच्या डोक्यात शिरले नाहीच. मग काय, शाहरूखने त्याच्या tweeमध्ये वापरलेल्या दोन शब्दांचा अर्थ कळावा म्हणून उदयला ‘गुगल’ करावे लागले. गुगलवर सर्च केल्यानंतर कुठे शाहरूखने वापरलेल्या दोन शब्दांचा अर्थ उदयला कळला. एकंदर काय, तर शाहरूख पुन्हा एकदा उदयचा गुरु ठरला. किंगखान को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकीन है...असे उदयला कदाचित त्याक्षणी वाटले असावे...होय ना?