शाहरूखला का बदलायचेय ‘पद्मावती’चे शीर्षक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 12:45 IST
संजय लीला भन्साळी यांचा आगामी बिगबजेट ‘पद्मावती’ ची शूटींग सुरू होण्याअगोदरच चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या तरी काही ...
शाहरूखला का बदलायचेय ‘पद्मावती’चे शीर्षक ?
संजय लीला भन्साळी यांचा आगामी बिगबजेट ‘पद्मावती’ ची शूटींग सुरू होण्याअगोदरच चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या तरी काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून चित्रपटासाठी दीपिका पादुकोण, शाहिद कपूर यांनी मात्र प्रचंड फी वाढवली आहे.शाहरूख खान हा देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्याला वाटतेय की, चित्रपटाचे शीर्षक बदलण्यात यावे. शीर्षक बदलल्याने हा चित्रपट स्त्रीभूमिकेभोवती फिरणारे कथानक होणार नाही.शाहरूख खान सध्या दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘द रिंग’ चित्रपटाचेही शूटींग करण्यात व्यस्त आहे. आता शाहरूख एकाच अटीवर या चित्रपटात काम करायला तयार आहे, जर चित्रपटाचे शीर्षक बदलले तरच...!