Join us

बॉलिवूड किंग बनल्यानंतरही शाहरूखचं एक स्वप्न होतं अधुरं, जे 30 वर्षानी आता पूर्ण होतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:58 IST

Shah Rukh Khan : वाद पेटला असला तरी ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली आहेत. दरम्यान शाहरूख खानने खुलासा केला की, 30 वर्षाच्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये त्याची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. ती इच्छा तो आता पूर्ण करत आहे.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) ला बॉलिवूडचा बादशाह किंवा बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हटलं जातं. तो केवळ भारतातच नाही तर परदेशातही फेमस आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या या सिनेमातील गाण्यांमुळे वाद पेटला आहे. यातील बेशरम रंग गाणं रिलीज झाल्यापासून हा वाद पेटला आहे.

वाद पेटला असला तरी ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली आहेत. दरम्यान शाहरूख खानने खुलासा केला की, 30 वर्षाच्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये त्याची एक इच्छा  अपूर्ण राहिली आहे. ती इच्छा तो आता पूर्ण करत आहे. खास बाब म्हणजे त्याचं हे स्वप्न त्याच्या पठाण सिनेमासोबत पूर्ण होत आहे. इतकं काही मिळवल्यानंतरही त्याचं असं काय स्वप्न आहे जे अधुरं आहे. चला जाणून घेऊ....

हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, शाहरूख खान आणि यशराज फिल्म्सचं जुनं नातं आहे. शाहरूखला त्याचा सगळ्यात हिट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमा यशराजनेच दिला होता. शाहरूखने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याच्या या सिनेमाचा त्याला रोमान्स किंग बनवण्यात मोठा हात आहे. तो म्हणाला होता की, तो आधी एका अ‍ॅक्शन सिनेमात काम करणार होता. ज्यावर आदित्य चोप्रा काम सुरू केलं होतं. पण अचानक ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ बनवण्याचा प्लान समोर आला.

करिअरच्या सुरूवातीला शाहरूखला अ‍ॅक्शन सिनेमे करायचे होते. पण 90च्या दशकात यशराज बॅनरने त्याला संपर्क केला आणि त्याला सांगितलं की, एक सिनेमा करायचा आहे. शाहरूखचे तेव्हा काही सिनेमे आले होते. तो म्हणाला की, माझं आणि आदित्यचं एका अ‍ॅक्शन सिनेमाबाबत बोलणं झालं होतं. पण एक दिवस तो म्हणाला की, अ‍ॅक्शन सिनेमा सोडला तर माझ्याकडे एक लव्हस्टोरी आहे. मग काय लगेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चं काम सुरू झालं. 

आता यशराजच्या बॅनरखाली तयार झालेल्या अ‍ॅक्शन 'पठाण' मधून शाहरूख खानचं 30 वर्ष जुनं स्वप्न पूर्ण होत आहे. शाहरूखचा हा सिनेमा 25 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. यात शाहरूख अॅक्शन करताना दिसणार आहे. सिनेमात दीपिका पादुकोन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडपठाण सिनेमा