Join us

करण जोहरने शेअर केला एका अभिनेत्याच्या संगीत सेरेमनीतील फोटो, काहीच तासांत मिळाले लाखो लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 16:21 IST

हा फोटो एका अभिनेत्याच्या संगीत सेरेमनीतील असून यात शाहरुख खान आपल्याला डान्स करताना दिसत आहे.

ठळक मुद्देकरण जोहरने शेअर केलेला हा फोटो अभिनेता संजय कपूरच्या संगीत सेरेमनीतील असून शाहरुख यात डान्स करताना दिसत असून करण जोहर त्याच्यामागे उभा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

अनेक कलाकार आपले जुने फोटो, व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि त्यांच्या फोटोंना खूप सारे लाईक्स देखील मिळतात. करण जोहर तर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर काही ना काही पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एका अभिनेत्याच्या लग्नातील संगीत सेरेमनीचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत शाहरुख खान आपल्याला डान्स करताना दिसत आहे. करणने हा फोटो पोस्ट केल्यानंतर काहीच वेळात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करण जोहरने शेअर केलेला हा फोटो अभिनेता संजय कपूरच्या संगीत सेरेमनीतील असून शाहरुख यात डान्स करताना दिसत असून करण जोहर त्याच्यामागे उभा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत करण जोहरने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा संजय कपूर आणि महीप कपूरच्या संगीतातील फोटो असून सुपरस्टार या फोटोत डान्स करताना दिसत आहे.

करण जोहरने हा फोटो पोस्ट केल्यानंतर केवळ चार तासांत 2 लाख 39 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. संजय कपूरने कमेंट करत हा फोटो 7 डिसेंबर 1998 चा असल्याचे म्हटले आहे तर अक्षय मारवाँने ती रात्र मला अजूनही आठवते... शाहरुख खानने छैय्या छैय्या या गाण्यावर ताल धरला होता असे कमेंटद्वारे सांगितले आहे.

टॅग्स :करण जोहरशाहरुख खान