Join us  

ऐश्वर्या अन् माधुरीवर भन्साळींनी केली होती पैशांची उधळण; 'देवदास'साठी खर्च केले ५० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 2:19 PM

Devdas: या सिनेमामध्ये ऐश्वर्या आणि माधुरीच्या लूकवर अमाप खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

बॉलिवूडमधील सर्वात मोठं नाव म्हणजे संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali). खासकरुन ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य सेट, कलाकारांचे महागडे कपडे यांच्यासाठीही ओळखले जातात. आजवरच्या कारकिर्दीत त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे देवदास. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन या सारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी हा चित्रपट केला. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. 

देवदास आणि पारो यांच्या प्रेमकथेवर आधारित असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. परंतु, हा चित्रपट लोकप्रिय ठरण्यामागे अनेकांनी त्यांचा घाम गाळला होता. इतकंच नाही तर भन्साळींनी अमाप पैसा खर्च केला होता. म्हणूनच, या सिनेमासाठी एकंदरीत किती पैसे खर्च झाले. चित्रपटाचं बजेट किती होते ते जाणून घेऊयात.

'देवदास' (devdas) हा सिनेमा तयार करण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले होते. सिनेमातील प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी यासाठी भन्साळींना कोणताही विचार न करता पैसा खर्च केला होता. विशेष म्हणजे त्यांचा हा खर्च भरुन देखील निघाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०४ कोटींची कमाई केली. इतकंच नाही तर, 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 11 फिल्मफेअर पुरस्कार, 16 आयफा पुरस्कार जिंकले.

देवदासमध्ये चंद्रमुखीची खोली म्हणजेच तिचा कोठा तयार करण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर, ऐश्वर्या रायसाठी अर्थात पारोसाठी ६०० पेक्षा अधिक साड्या डिझाइन केल्या होत्या. त्यामुळे या सिनेमामध्ये  ऐश्वर्या आणि माधुरीच्या लूकवर आणि अन्य अवतीभोवतीच्या वस्तूंवर अमाप खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, या सिनेमात शाहरुख, जॅकी, माधुरी आणि ऐश्वर्या ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकली होती. IMDb च्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या आधी हा चित्रपट सलमान खानला ऑफर करण्यात आला होता. मात्र, सलमानने त्यास नकार दिला. तसंच ऐश्वर्यापूर्वी करीनाला पारोची ऑफर मिळाली होती. आणि, माधुरीऐवजी सुष्मिता सेन, मनीषा कोईराला यांना चंद्रमुखीची भूमिका ऑफर झाली होती.  

टॅग्स :बॉलिवूडसिनेमाशाहरुख खानमाधुरी दिक्षितऐश्वर्या राय बच्चनसंजय लीला भन्साळी