'शोले'मध्ये गब्बर सिंहची भूमिका साकारलेले अभिनेते अमजद खान यांचं १९९२ साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हा त्यांचं वय ५१ वर्ष इतकं होतं. आता इतक्या वर्षांनंतर अमजद खानचा मुलगा शादाबने एका मुलाखतीत वडिलांच्या मृत्यूबाबत भाष्य केलं. इंजेक्शन द्यायला उशीर झाल्याने अमजद खान यांचा मृत्यू झाल्याचा खुलासा शादाबने केला.
शादाब म्हणाला, "जेव्हा वडिलांचं निधन झालं त्यादिवशी मी घरी नव्हतो. मी रात्री ८ वाजता घरी आलो तेव्हा मला सांगितलं की पप्पा उठत नाहीयेत. आदल्याच दिवशी ते एका मीटिंगला जाऊन आले होते. त्यामुळे ते थकले होते. म्हणून ते आराम करत असतील असं आम्हाला वाटलं. माझ्या आईने मला त्यांना उठवायला सांगितलं. पण जेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांचं शरीर थंड पडलं होतं. मी लगेचच डॉक्टरांना बोलवलं. त्यांनी सांगितलं की वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन आणायला पाठवलं. मी इंजेक्शन घेऊन आलो पण तोपर्यंत उशीर झाला होता".
"डॉक्टरांचे ते शब्द ऐकताच मला राग अनावर झाला. मी रागाच्या भरात डॉक्टरांवर हात उचलला होता. घरातील भांडीही मी तोडली होती. भींतीवर मी जोरजोरात माझ्या हाताने मारत होतो. आमच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. सगळं काही सांभाळू शकेल अशा मनस्थितीत माझी आई नव्हती. मी तेव्हा फक्त १८ वर्षांचा होतो. अशा परिस्थितीत सलीम खान यांनी आम्हाला साथ दिली. आणि तेव्हा सगळा खर्च केला", असंही शादाबने सांगितलं.
Web Summary : Amjad Khan's son, Shadab, disclosed that his father's death in 1992 was hastened by a delayed injection following a heart attack. Shadab recounted his rage and grief, noting Salim Khan's support during that difficult time.
Web Summary : अमजद खान के बेटे शादाब ने खुलासा किया कि 1992 में उनके पिता की मृत्यु दिल का दौरा पड़ने के बाद इंजेक्शन में देरी के कारण हुई। शादाब ने अपने गुस्से और दुख को याद किया, और सलीम खान के समर्थन का उल्लेख किया।