Join us

गौरव चन्नाच्या शबाना आझमी जबरा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 17:29 IST

अभिनेत्री शबाना आझमी या शाहरुख खानने ‘फॅन’ चित्रपटात साकारलेल्या गौरव चन्ना या पात्राच्या जबरा फॅन आहेत. ट्विटरवर त्यांनी या ...

अभिनेत्री शबाना आझमी या शाहरुख खानने ‘फॅन’ चित्रपटात साकारलेल्या गौरव चन्ना या पात्राच्या जबरा फॅन आहेत. ट्विटरवर त्यांनी या संदर्भात कौतुक केले आहे. शाहरुखचा फॅन नुकताच पाहिला. गौरव चन्ना हे पात्र आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली. यापूर्वी जावेद अख्तर साहेबांनी चित्रपट पाहून कविता लिहिली होती. आता तुमच्यामुळे मला पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचा आनंद होत असल्याचे वाटते, असेही शाहरुख म्हणाला.}}}}त्यावर शबाना म्हणतात, त्यांनी लिहिलेली पराशर ही नज्म गौरवच्या पात्रासासाठी लिहिली असल्याचे मला वाटते.