Join us

किसींग सीन्सबाबत सेन्सॉर बोर्ड 'बेफिक्रे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 12:50 IST

'बेफिक्रे' सिनेमाची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती या सिनेमातील किसींग सीनमुळे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा सिनेमापेक्षा पोस्टरवरच ...

'बेफिक्रे' सिनेमाची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती या सिनेमातील किसींग सीनमुळे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा सिनेमापेक्षा पोस्टरवरच जास्त चर्चा झाली कारण पोस्टरवर रणवीर आणि वाणी किस करताना दिसत होते. आता पुन्हा एकदा हा किसींग सीन्सचा मुद्दा गाजतोय. याला कारणही तसेच आहे नेहमी अशा आक्षेपार्हय गोष्टींना कात्री लागते. मात्र यंदा काही वेगळेच चित्र पाहायला मिळतेय. सेन्सॉरबोर्डाने चक्क12 किसींग सीन्स असणा-या 'बेफिक्रे' सिनेमाला 'युए' सर्टीफिकेट दिलेय. त्यामुळेच सोशल मीडियावर सेन्सॉर बोर्डावर टीका  केली जात आहे. नुकताच रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधून रणवीर आणि वाणीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. आदित्य चोप्राने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ९ डिसेंबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने असे सीन्स असणारे सिनेमांवेळी कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. 'बार बार देखो' चित्रपटात स्त्रियांची अंतर्वस्त्र दाखविण्यात आले होत. हे आपल्या संस्कृती विरुद्ध असल्याचे सांगत त्या सीन्सना कात्री लावण्यात आली. तसेच, 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात अनुष्का शर्माच्या किसींग सीनवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाची सिनेमाला सर्टीफिकेट देण्याची नेमकी निकष कोणती असा सवाल ही उपस्थित होतोय.