Join us

​आरवला पाहून अक्षय का झाला भावूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 13:06 IST

अक्षय कुमार बॉलिवूडचा एक यशस्वी अभिनेता आहे. सोबत एक प्रेमळ पती आणि कर्तव्यदक्ष पिता सुद्धा आहे. कुटुंबावर भरभरून प्रेम करणाºया अक्षयने यंदाची दिवाळी केपटाऊनमध्ये साजरी केली. दिवाळीआधी तो बेटर हाफ टिष्ट्वंकल,

अक्षय कुमार बॉलिवूडचा एक यशस्वी अभिनेता आहे. सोबत एक प्रेमळ पती आणि कर्तव्यदक्ष पिता सुद्धा आहे. कुटुंबावर भरभरून प्रेम करणाºया अक्षयने यंदाची दिवाळी केपटाऊनमध्ये साजरी केली. दिवाळीआधी तो बेटर हाफ टिष्ट्वंकल, मुलगा आरव आणि नितारा यांच्यासोबत केपटाऊनला रवाना झाला. या ट्रिपमध्ये अक्षयने सर्वाधिक ‘क्वालिटी टाईम’ कुणासोबत घालवला माहितीय? होय, मुलगा आरव याच्यासोबत. इन्स्टाग्रामवर अक्षयने त्याचा व आरवचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. आरव आणि अक्षय समुद्राच्या काठी एका बेंचवर निवांत बसलेले या फोटोत दिसतात. या फोटोला अक्षयने एक सुंदर कॅप्शन लिहिलेयं.  एका भावूक पित्याने लिहिलेले हे कॅप्शन हृदयाला स्पर्शून जाणारे आहे. ‘माझा चिमुकला   आता चिमुकला राहिलेला नाही . तो मोठा झालाय. जवळपास माझ्या उंचीइतका...माझेच जोडे घालणारा...,’असे त्याने लिहिलेयं. केवळ एवढेच नाही तर ‘जब बेटे का पांव पिता के जूते में आने लगे, तो वो बेटा नहीं दोस्त बन जाता है’,याचे स्मरणही त्याने करून दिले. एकंदर काय, तर वाढत्या आरवला पाहून अक्षय भावूक झाला. त्या दोघांचा फोटो पाहून या बाप-लेकात मैत्रीच्या नात्याची सुरुवात झालीयं, हेच दिसतयं. अक्षयने अलीकडे ‘जॉली एलएलबी2’ आणि ‘नाम शबाना’चे शूटींग संपवले. ‘नाम शबाना’ हा अक्षयचा सुपरहिट सिनेमा ‘बेबी’चा सीक्वल आहे. यात अक्षय तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. या धावपळीतून काही दिवसांचा ब्रेक घेत, अक्षय सध्या कुटुंबासोबत सुटी एन्जॉय करतो आहे. तसे येणारे वर्ष अक्षयसाठी बरेच बिझी असणार आहे. येत्या वर्षात अक्षयचे एक दोन नव्हे तर चार चित्रपट रिलीज होणार आहेत.