विरुष्काच्या शाही रिसेप्शनचे पाहा फोटो, नवदाम्पत्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 21:59 IST
विरुष्काच्या शाही रिसेप्शनचा सोहळा दिमाखात पार पडत असून, त्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित लावली आहे. पाहा फोटो!
विरुष्काच्या शाही रिसेप्शनचे पाहा फोटो, नवदाम्पत्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील लग्न ठरले असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. इटलीत अतिशय थाटामाटात लग्न करणाºया या दाम्पत्याच्या लग्नाचे रिसेप्शनही तेवढ्याच दणक्यात पार पडत आहे. दिल्ली येथील ताज डिप्लोमेटिक इंक्लेवमध्ये आयोजित केलेल्या या रिसेप्शनमध्ये देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. सोहळ्यात विराट-अनुष्का या दाम्पत्याचा अंदाज बघण्यासारखा असून, त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. काही वेळापूर्वीच विरुष्का स्टेजवर पोहोचले असून, दोघांच्याही अदा बघण्यासारख्या आहेत. विराटने काळ्या रंगाची शेरवानी, तर अनुष्काने आॅरेंज कलरची साडी परिधान केली आहे. या नवदाम्पत्याच्या कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जतीन कोचर यांनी डिझाइन केले. दरम्यान, या सोहळ्यात पाहुण्यांची प्रचंड गर्दी असून, त्यात सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. त्यामुळे या हॉटेलच्या चहूबाजूने कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बुधवारी सायंकाळी विराट आणि अनुष्काने पीएम मोदी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण दिले होते. दरम्यान, बत्रा टेंट हाउसने रिसेप्शनमध्ये उभारण्यात आलेला टेंट सजविला आहे. बेबी पिंग, क्रीम आणि आॅरेंज कलरची संगत असलेला हा टेंट खूपच उठून दिसत आहे. आयोजकांनी या टेंटकरिता सिल्क कपड्याचा वापर केला आहे. ज्या सोफ्यावर हे नवदाम्पत्य बसणार आहे, तो नवा असून, त्याची किंमत पाच लाख आहे.