see pics: अचानक कॅमेऱ्यापासून चेहरा का लपवू लागली सारा अली खान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 20:30 IST
आत्तापर्यंंत प्रत्येकवेळी सारा अली खान मीडियाला हसतमुखाने सामोरे गेली. पण आज मंगळवारी मात्र कॅमेरा पाहून अचानक ती आपला चेहरा लपवू लागली.
see pics: अचानक कॅमेऱ्यापासून चेहरा का लपवू लागली सारा अली खान?
सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खान लवकरचं बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. सध्या सारा दोन चित्रपटांत बिझी आहे. एक म्हणजे ‘केदारनाथ’ आणि दुसरा म्हणजे ‘सिम्बा’. यापैकी कोणत्या चित्रपटातून साराचा डेब्यू होईल, हे निश्चित नाही. पण अचानक सारा मीडियापासून चेहरा लपवू लागली आहे. आता का, हे मात्र कळायला मार्ग नाही. सध्या सारा अली खान डान्स शिकतेय. या डान्स क्लासच्या बाहेर साराला अनेकदा बघितले गेले. आत्तापर्यंंत प्रत्येकवेळी ती मीडियाला हसतमुखाने सामोरे गेली. पण आज मंगळवारी मात्र कॅमेरा पाहून अचानक ती आपला चेहरा लपवू लागली.
यावेळी सारा ब्ल्यू कलरचा सलवार-कुर्ता आणि त्यावर पांढरी ओढणी घेतलेली होती. ती गोड दिसत होती. पण आपण कॅमे-यात येऊ नये, हाच तिचा प्रयत्न होता.
खरे तर नट्या मेकओव्हर करतात, त्यावेळी त्या असा चेहरा लपवताना दिसतात. असे असेल तर साराच्या चेह-यात लवकरच बदल पाहायला मिळतील. येत्या काही दिवसांत साराच्या चेहरा लपवण्यामागचे खरे कारण आपल्याला कळेलच.अलीकडे सारा अली खान मंदिरात दानधर्म करताना दिसली होती.
आम्ही वर म्हटल्याप्रमाणे, साराचा डेब्यू ‘केदारनाथ’मधून होणार की ‘सिम्बा’मधून हे अद्याप अधांतरी आहे. खरे तर साराचा ‘केदारनाथ’मधूनचं डेब्यू होणार होता. पण गेल्या काही दिवसांत ‘केदारनाथ’ बराच रखडला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. काही दिवसांपूर्वी अभिषेक कपूर यांनी स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर‘केदारनाथ’ची रिलीज डेट जाहिर केली होती. त्यानुसार, येत्या ३० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिचा हा डेब्यू चित्रपट पाहण्यासाठी लोक उत्सूक होते. पण आता बॉक्सआॅफिसवरचा क्लॅश टाळण्यासाठी ‘केदारनाथ’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे. ‘केदारनाथ’ येत्या ३० नोव्हेंबरला रिलीज झालाच तर त्याची थेट टक्कर अक्षय कुमार व रजनीकांत यांच्या ‘2.0’ शी होणार आहे. कारण ‘2.0’ हा चित्रपटही नोव्हेंबरच्या अखेरिस प्रदर्शित होतो आहे. ‘केदारनाथ’च्या मेकर्सला बॉक्सआॅफिसवरचा हा पंगा नको आहे.‘केदारनाथ’च्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकलेच तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा सारा अली खानचा डेब्यू सिनेमा ठरेल.