बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या मॉडेल रोहमन शॉल याला डेट करतेय. स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या रोहमनशिवाय अलीकडे सुश्मिताचे पान हलत नाही. एका फॅशन इव्हेंटमध्ये सुश्मिता व रोहमनची भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. गेल्या काही दिवसांत दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. दोघांनीही आपले नाते जगापुढे मान्य केले आहे. गत १९ नोव्हेंबरला सुशने आपला वाढदिवस साजरा केला. साहजिकच रोहमनशिवाय सुशच्या बर्थ डेचे सेलिब्रेशन शक्यचं नाही.
या सेलिब्रेशनचे फोटो आत्ता कुठे समोर आले आहेत आणि हे फोटो पाहता सुश - रोहमन एकमेकांत किती आकंठ बुडाले आहेत, हे नव्याने सांगायची गरज नाही. सुश्मिताने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत सुश्मिताच्या दोन्ही मुली,आई आणि रोहमन असे सगळे आहेत. एका फोटोत रोहमनने सुशला आपल्या मिठीत घेतले आहे. एकंदर काय, तर सुश व रोहमनच्या नात्याला घरच्यांनीही स्वीकारले आहे. आता केवळ लग्नाची तारीख ठरण्याची तेवढी देर.
एका फॅशन इव्हेंटमध्ये दोघांचीही भेट झाली आणि पुढे दोघेही एकमेकांच्या पे्रमात पडले. रोहमनने सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले असून सगळे काही जुळून आले तर नव्या वर्षांत दोघेही लग्न करू शकतात. हेच कारण आहे की, अलीकडे सुश व रोहमन दोघेही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.