Join us

SEE PICS : बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे सुनील शेट्टीच्या मुलाची गर्लफ्रेंड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 21:08 IST

बºयाच काळानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी याचा मुलगा त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडमुळे लाइमलाइटमध्ये आला आहे. नुकतेच अहान शेट्टी ...

बºयाच काळानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी याचा मुलगा त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडमुळे लाइमलाइटमध्ये आला आहे. नुकतेच अहान शेट्टी याला त्याच्या गर्लफ्रेंडसाबेत मुंबईच्या बांद्रा परिसरात बघण्यात आले होते; मात्र तुम्हाला अहानची गर्लफ्रेंड कोण आहे हे माहिती आहे काय? नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अहानची गर्लफ्रेंड बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत खूपच सुंदर आणि ग्लॅमरस असल्याने ती नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. अहानच्या गर्लफ्रेंडचे नाव तानिया श्रॉफ आहे. ती एका बिझिनेसमॅनची मुलगी आहे. तानिया आणि अहान गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. वास्तविक अहान आणि तान्या लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघांमधील केमिस्ट्री खूपच चांगली आहे. खरं तर तान्या अहानची बहीण आथिया शेट्टी हिचीदेखील चांगली मैत्रीण आहे. बºयाचदा या दोघी एकत्र बघण्यात आल्या आहेत. अहान त्याच्या रिअल लाइफमध्ये खूपच लाजाळू स्वभावाचा आहे. तर तान्या खूपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. तान्या सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असल्याने ती नेहमीच चर्चेत असते. इन्स्टावरील तिचे फोटो बघून असे वाटते की, ही एखादी सेलिब्रिटी असावी. जर एखाद्या निर्मात्याची नजर तिच्या फोटोंवर पडली तर तिला चित्रपटात संधी देण्याचा त्या निर्मात्यांकडून विचार होऊ शकतो, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण तान्या खूपच सुंदर असून, तिचे हॉट फोटोज आकर्षित करणारे आहेत. सध्या तान्या तिचे शिक्षण पूर्ण करीत असून, अभिनय क्षेत्रात येण्याबाबत तिचा कुठलाही विचार नसल्याचे समजते; मात्र त्याचा स्टाइल स्टेटमेंट दाद देण्यासारखा आहे. ती अतिशय बिंधास्तपणे तिचे स्टायलिश आणि बिकिनी फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. तान्याचा हाच स्टायलिश स्वभाव तिला सेलिब्रिटीचा दर्जा मिळवून देतो. त्याचबरोबर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये भर घालणारा ठरतो.