Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : शाहिद कपूर, करिना कपूर अन् मीरा राजपूत एकाच छताखाली झाले स्पॉट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 21:45 IST

गेल्या आठवड्यात अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर खान हे एकाच ठिकाणी जीमसाठी येत असल्याचे काही फोटोज् समोर आले ...

गेल्या आठवड्यात अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर खान हे एकाच ठिकाणी जीमसाठी येत असल्याचे काही फोटोज् समोर आले होते. जेव्हा मीडियामध्ये हे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा हे दोघेही चुपचाप जीम बदलतील अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु असे काहीही घडले नसून, अजूनही हे दोघे एकाच ठिकाणी जीमसाठी येत आहेत. उलट शाहिद पत्नी मीरा राजपूत हिलाही याच ठिकाणी जीमसाठी घेऊन येत आहे. याबाबतचे काही फोटो समोर आले असून, त्यांच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. नुकतेच शाहिद आणि मीराला जिममधून आपल्या कारमधून बाहेर पडताना बघण्यात आले होते. जेव्हा हे दोघे जीमच्या ठिकाणी पोहोचले त्याच्या काही वेळानंतरच करिनाही याठिकाणी पोहोचली. मात्र यावेळी तिच्यासोबत तिची जीम पार्टनर अमृता अरोरा बघावयास मिळाली नाही. करिना एकटीच याठिकाणी पाहोचली होती. यावेळी करिनाने पांढºया रंगाचे शर्ट आणि जेगिंग घातले होते. तर शाहिद काळ्या रंगाच्या जॉगर पॅण्ट आणि ग्रे टी-शर्टवर बघावयास मिळाला.  वास्तविक शाहिद कपूर नेहमीच जीमविषयी अधिक जागरूक राहिला आहे, तर मीरा आणि करिनाने प्रेग्नेंसीनंतर जीम जाण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी करिना आणि शाहिदमध्ये प्रेमांकुर फुलले होते. त्यावेळी सर्वांत हॉट कपल म्हणून यांच्याकडे बघितले जात होते. दोघे आयुष्यभर एकमेकांसोबत राहतील असेच काहीसे चित्र दिसत होते. मात्र काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ते दोघे नेहमीच एकमेकांना टाळत आले आहेत. सध्या हे दोघे त्यांच्या-त्यांच्या संसारात व्यस्त आहेत. परंतु जेव्हा केव्हा या दोघांचा सामना होतो, तेव्हा त्यांच्याविषयी चर्चा रंगते. असो, करिना आणि शाहिदच्या प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचे झाल्यास, शाहिद सध्या संजय लीला भंसाळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात त्याच्यासोबत रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, तर करिना कपूर ही लवकरच तिच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटाची शूटिंग आॅगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटात तिच्यासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर दिसणार आहेत.