SEE PICS : रणबीर कपूूर अन् दीपिका पादुकोण एकाच छताखाली झाले स्पॉट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 16:01 IST
बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेकअप झालेल्या कपलमध्ये सर्व काही आलबेल होत असल्याचे दिसून येत आहे. अगोदर कॅटरिना कैफ, सलमान खान यांच्यात ...
SEE PICS : रणबीर कपूूर अन् दीपिका पादुकोण एकाच छताखाली झाले स्पॉट!
बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेकअप झालेल्या कपलमध्ये सर्व काही आलबेल होत असल्याचे दिसून येत आहे. अगोदर कॅटरिना कैफ, सलमान खान यांच्यात पुन्हा जवळीकता निर्माण झाली, तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हेही पुन्हा एकदा नाते दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या जोडप्याव्यतिरिक्त एकेकाळचे आणखी एक हॉट कपल म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांच्यातही आता सर्व काही सामान्य झाले असून, त्यांच्यातील दुरावा आता कमी होताना दिसून येत आहे. याचा प्रत्यय दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या बर्थ डे पार्टीत आला. हे दोघेही एकाच छताखाली एकत्र आले. शिवाय त्यांनी एकमेकांना न टाळता गप्पा मारल्या. एकेकाळी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड राहिलेल्या या दोघांचे जेव्हा ब्रेकअप झाले तेव्हा ते एकमेकांना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असत. मात्र आता तशी परिस्थिती राहिली नसून, त्याच्यातील संबंध पूर्वीसारखेच सामान्य झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच एका छताखाली आले असता, या दोघांनी आपुलकीच्या भावनेने एकमेकांची विचारपूस केली. त्यामुळे हे दोघे पूर्वीसारखेच मित्र झाले असावेत, अशी चर्चा पार्टीत रंगली होती. दरम्यान, या दोघांव्यतिरिक्त पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. शाहरूख खान, आलिया भट्ट, राजकुमार हिरानी आदींनी पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी शाहरूख आणि इम्तियाज यांनी त्यांच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे उद्यापासून प्रमोशन केले जाणार असल्याचेही जाहीर केले. या चित्रपटात शाहरूख आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या दोघांची जोडी जबरदस्त चर्चेत आहे. इम्तियाज यांच्या पार्टीविषयी सांगायचे झाल्यास, पार्टीत उपस्थित राहिलेल्या बहुतांश सेलिब्रिटींनी कॅजुअल लुकमध्ये एंट्री केली होती. विशेष म्हणजे कॅजुअल ड्रेसमध्ये असतानाही सर्व स्टार्स जबरदस्त स्टायलिश दिसत होते. दीपिका आणि रणबीरचा अंदाज तर बघण्यासारखा होता. दोघांची जोडी खूपच छान दिसत होती. यावेळी दोघेही एकमेकांशी चर्चा करताना बघावयास मिळाले होते.