SEE PICS : करिष्मा कपूरने बहीण करिना कपूरला टाकले मागे; शेअर केला हॉट बिकिनी फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2017 15:26 IST
९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री करिष्मा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या कौटुंबिक कलहामुळे चर्चेत होती. आता ती नवºयापासून वेगळी ...
SEE PICS : करिष्मा कपूरने बहीण करिना कपूरला टाकले मागे; शेअर केला हॉट बिकिनी फोटो!
९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री करिष्मा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या कौटुंबिक कलहामुळे चर्चेत होती. आता ती नवºयापासून वेगळी झाली असून, पुन्हा एकदा आपले आयुष्य सावरण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बºयाच वर्षांनंतर ती पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली असून, तिचा हॉट लुक बघावयास मिळाल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, आपल्या चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी तिने तिच्या सोशल अकाउंटवर चक्क बिकिनी फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ब्लॅक बिकिनीमध्ये असलेली करिष्मा बºयाच दिवसांनंतर तिचा करिष्मा दाखविताना दिसत आहे. डोक्यावर हॅट, काळा गॉगल, रेड लिपस्टिक असा लुक करिष्मा सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे तिचा हा हॉट लुक बहीण करिना कपूरलाही मागे टाकणारा ठरत आहे. वास्तविक करिष्मा लग्नानंतर पहिल्यांदाच अशा अवतारात बघावयास मिळाली. लग्नानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली होती. मात्र पतीसोबत वारंवार होत असलेल्या मतभेदामुळे तिने त्याच्यापासून दूर जाणे पसंत केले. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या पतीबरोबर घटस्फोट घेतला होता. आता करिष्मा संदीप तोष्णीवाल याला डेट करीत असून, लवकरच ती त्याच्यासोबत विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. हे दोघे बºयाचदा पार्टी तसेच फॅमिली इव्हेंटमध्ये एकत्र बघावयास मिळाले. दोघांमधील वाढती जवळीकता लक्षात घेता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. शिवाय हे दोघे सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच संदीपने करिष्मासाठी त्याच्या पत्नीला गटस्फोट दिला होता. आता तर अशीही माहिती समोर येत आहे की, करिष्मा आणि संदीप सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. त्याचबरोबर एकदा बॉलिवूडला बाय-बाय केल्यानंतर पुन्हा चित्रपटांमध्ये परतण्याची तिची मानसिकता नाही. मात्र असे म्हटले जाते की, ‘जुडवा-२’मध्ये ती कॅमिओ करताना बघावयास मिळेल.