आता इशिताचा वर कोण, हे लग्नापर्यंत कुणालाही ठाऊक नव्हते. लग्नानंतर इशिता व तिच्या वराचे फोटो समोर आलेत आणि मग कुठे नवरदेवाचे नाव सगळ्यांना कळले. होय, इशिताने अभिनेता वत्सल सेठसोबत लग्नगाठ बांधली.
वत्सल हा इशितापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. वत्सल व इशिता या दोघांनी ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
इशिता व वत्सल यांच्या लग्नात अगदी जवळचे मित्र व नातेवाईक हजर होते. याशिवाय अजय देवगण, काजोल, बॉबी देओल व टॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. या लग्नाचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
इशिताने २०१२ मध्ये तेलगू चित्रपटातून अॅक्टिंग डेब्यू केला होता. इशिता ही मिस इंडिया व बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. लवकरच इशिता व तनुश्री दत्ता एकत्र काम करणार आहेत. इशिता चित्रपटांशिवाय टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे. ‘दृश्यम’ या चित्रपटात इशिताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यामुळे अजय आपल्या पत्नीसोबत आवर्जुन इशिताच्या लग्नाला उपस्थित राहिला. वत्सल सेठबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या तो ‘हासिल’ या मालिकेत बिझी आहे.
ALSO READ : ... आणि इशिता रडली
‘फिरंगी’ हा चित्रपट एका लहान गावातील मुलाची कथा आहे. जो एका एनआरआय मुलीच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात इशिता दत्ता व मोनिका गिल या दोघी मुख्य भूमिकेत आहेत.