Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PIC : क्युट मीशा जेव्हा मम्मी-पप्पाबरोबर लंचसाठी जाते...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 20:08 IST

अखेर आज संधी मिळालीच... जेव्हा क्युट मीशाचे मम्मी पापाबरोबर लंचसाठी जातानाचे काही फोटोज् कॅमेºयात कैद करता आले. आतापर्यंत आपल्याला ...

अखेर आज संधी मिळालीच... जेव्हा क्युट मीशाचे मम्मी पापाबरोबर लंचसाठी जातानाचे काही फोटोज् कॅमेºयात कैद करता आले. आतापर्यंत आपल्याला मीशाचा स्पष्ट चेहरा दिसणारे फारसे फोटोज् बघावयास मिळाले नाहीत. मात्र आज ती संधी मिळाली असून, त्यात मीशा खूपच गोंडस दिसत आहे. अभिनेता शाहिद कपूरसाठी त्याची मुलगी मीशा सर्वकाही आहे. कारण जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो मुलगी मीशाबरोबर वेळ व्यतित करीत असतो. असो, आजचे काही फोटोज् आमच्यात हाती लागले असून, ज्यामध्ये शाहिद आपल्या फॅमिलीबरोबर लंच करण्यासाठी बाहेर जाताना दिसत आहे. फोटोंमध्ये शाहिद व्यतिरिक्त मीशा अन् तिची मम्मी मीरा राजपूतही दिसत आहे. मीशाने पांढºया रंगाचा फ्रॉक घातलेला असून, ती तिच्या मम्मीच्या कडेवर असल्याचे दिसत आहे. हा पहिलाच प्रसंग आहे की, मीशाला तिच्या पॅरेंट्सनी लंचसाठी बाहेर नेले. काल झालेल्या वर्ल्ड डान्स डेनिमित्त शाहिदने मीशाबरोबर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये मीशा खूपच क्युट दिसत होती. आज पुन्हा तिची झलक कॅमेºयात टिपण्याची संधी मिळाल्याने शाहिदच्या फॅन्ससाठी ही चांगली बातमीच म्हणावी लागेल.  सध्या शाहिद संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिलीज अगोदरच हा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड आतुरता आहे. चित्रपटात शाहिद राजा रावल रत्न सिंग याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत.