Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा : ‘भूमी’ चित्रपटाचे टीझर पोस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 13:09 IST

बॉलिवूडच्या संजूबाबाला तुम्ही मिस करताय ना? कित्येक दिवसांपासून तो मोठ्या पडद्यावर दिसलेलाच नाहीये. पण, आता तुमची प्रतीक्षा संपलीय. तो ...

बॉलिवूडच्या संजूबाबाला तुम्ही मिस करताय ना? कित्येक दिवसांपासून तो मोठ्या पडद्यावर दिसलेलाच नाहीये. पण, आता तुमची प्रतीक्षा संपलीय. तो  लवकरच दिग्दर्शक ओमंग कुमार यांच्या ‘भूमी’ चित्रपटातून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. चित्रपट भूषण कुमार यांच्या टी-सीरिज आणि ओमंग कुमार यांच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत साकारण्यात आलेला आहे. येरवडा जेलमध्ये गेल्यापासून संजय दत्त हा मोठ्या पडद्यापासून दुरावला गेला. प्रेक्षकांच्या भेटीसह पुन्हा एकदा नवीन पर्व सुरू करावं अशी त्याची मनोमन इच्छा आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलही तेवढाच उत्सुक आहे. त्याची उत्सुकता व्यक्त करताना संजूबाबा म्हणतो,‘मी माझ्या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करतो आहे. गत बराच काळ मी अभिनयाच्या बाबतीत कृतिशील नव्हतो. मात्र आता कॅमेºयासमोर येण्यासाठी मी खुप उत्सुक आहे.’ दिग्दर्शक ओमंग कुमार हे त्यांचे कथानक, स्टारकास्ट, स्टोरीलाईन यांच्यामुळे ओळखले जातात. त्यांचा याअगोदरचा चित्रपट ‘सरबजीत’ ने समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्या अभिनयाचे कौतुक चित्रपटाच्या ओघानेच केले जाते. आता संजूबाबाला घेऊन ते अशाच प्रकारचा चित्रपट साकारतोय आणि याबाबतीत ते खुप उत्सुक असल्याचे जाणवेतय.