Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : ‘काला चश्मा..’तील कॅटची आणखी एक अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 17:28 IST

‘बार बार देखों’ या चित्रपटातील ‘काला चश्मा’ हे गाणे येत्या २७ जुलैला रिलीज होते आहे. गत बुधवारी ‘काला चश्मा’ गाण्याचा फर्स्ट लूक जारी केल्यानंतर आज सोमवारी या गाण्यातील एक नवे स्टिल रिलीज करण्यात आले.

‘बार बार देखों’ या चित्रपटातील ‘काला चश्मा’ हे गाणे येत्या २७ जुलैला रिलीज होते आहे. तत्पूर्वी प्रेक्षक आणि श्रोत्यांची उत्सूकता चाळवण्याचे प्रयत्न अर्थात गाण्याचे धम्माल प्रमोशन मेकर्सकडून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून या गाण्यातील कॅटरिना कैफ व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या एक एक अदा चाहत्यांना पाहायला मिळत आहे. गत बुधवारी ‘काला चश्मा’ गाण्याचा फर्स्ट लूक जारी केल्यानंतर आज सोमवारी  या गाण्यातील एक नवे स्टिल रिलीज करण्यात आले. सिंदूर, मोठी हिरवींकच टिकली, हिरव्या बांगड्या आणि डोळ्यांवर काळा गॉगल अशा देसी अवतारात कॅटरिना यात दिसत आहे. करणने त्याच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर कॅटरिनाचा हा लूक  पोस्ट केला आहे. तुम्हीही बघा तर!!}}}}