पाहा, जान्हवी कपूरच्या रूपातील ‘आर्ची’ आणि ईशान खट्टरच्या रूपातील ‘परश्या’, ‘धडक’चा ट्रेलर रिलीज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 13:00 IST
आज जान्हवीचा पहिला डेब्यू सिनेमा ‘धडक’चा ट्रेलर रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपलीच.
पाहा, जान्हवी कपूरच्या रूपातील ‘आर्ची’ आणि ईशान खट्टरच्या रूपातील ‘परश्या’, ‘धडक’चा ट्रेलर रिलीज!!
मोठी मुलगी जान्हवी कपूर हिचा पहिला चित्रपट पाहणे, हे श्रीदेवींचे स्वप्न होते. दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या मुलीच्या लॉँचिंगची जबाबदारी करण जोहरवर सोडली होती. श्रीदेवींनी या चित्रपटासाठी जान्हवीला खास तयार केले होते. जान्हवीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून डान्सिंग क्लासपर्यंत सगळ्यांवर श्रीदेवींची नजर असायची. मुलीचा डेब्यू सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी आतूर होत्या. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ रिलीज होण्यापूर्वीच श्रीदेवींना जगाचा निरोप घेतला. आई गेली, त्यादिवशीही जान्हवी ‘धडक’च्या शूटींगमध्ये बिझी होती आणि म्हणून आईच्या सहवासातील अखेरच्या क्षणांनाही ती मुकली. याचे शल्य जान्हवीला कायमचे असेल. पण सोबतच आपण आईचे स्वप्न पूर्ण करतोय, याचा अभिमानही जान्हवीला असेल.आज जान्हवीचा पहिला डेब्यू सिनेमा ‘धडक’चा ट्रेलर रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपलीच. ‘धडक’ हा ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, हे आपण जाणतोच. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशा: याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही ‘सैराट’ने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. पण निश्चितपणे ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे, हे ट्रेलर पाहून जाणवते. चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात, पण जान्हवी आणि ईशान या नव्या-को-या जोडीला पाहणे, एक नवा अनुभव आहे. तुम्हीही हा अनुभव घ्या आणि ‘धडक’चा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला कळवा.तुम्हाला ठाऊक आहेच की, जान्हवीचा हा पहिला चित्रपट आहे. पण ईशानचा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी ईशानचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ रिलीज झाला आहे.ALSO READ : जान्हवी, मला माफ कर...! ‘धडक’च्या ट्रेलर रिलीजपूर्वी अर्जुन कपूरचा बहिणीसाठी भावूक संदेश!!