Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE HOT PICS : ईशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 21:51 IST

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यांच्या या फोटोंनी त्या-त्या वेळी धूमही उडविली आहे. परंतु ...

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यांच्या या फोटोंनी त्या-त्या वेळी धूमही उडविली आहे. परंतु अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकतेच केलेल्या फोटोशूटने बोल्डनेसच्या परिसीमा ओलांडल्या आहेत. फोटोजमध्ये ईशाचा हॉट आणि बोल्ड अंदाज घायाळ करणारा असून, तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होत आहेत. ईशाच्या चाहत्यांसाठी तर हे फोटो पर्वणीच ठरत असून, त्यास लाखोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेण्ट दिल्या जात आहेत. होय, ईशा गुप्ताने नुकतेच हॉट फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोज आणि मिनी व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ईशाचे हे फोटो सध्या जबरदस्त चर्चिले जात असल्याने ईशा तिच्या आगामी चित्रपटांपेक्षा फोटोंमुळेच अधिक चर्चेत आहे. ईशा गुप्ताने अक्षयकुमार याच्या सुपरहिट ‘रुस्तम’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. आता ती अजय देवगणसोबत ‘बादशाहो’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. ‘बादशाहो’मध्ये अजय आणि ईशा व्यतिरिक्त इलियान डिक्रूज, विद्युत जामवाल आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर सनी लिओनीदेखील एका गाण्यात ठुमके लावताना दिसणार आहे. खरं तर ईशा गुप्ता नेहमीच तिच्या सेक्सी अंदाजासाठी ओळखली जाते. तिला बॉलिवूडची अ‍ॅँजेलिना जोली असेही म्हटले जाते. दरम्यान, ईशाने हे फोटोशूट तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत केले आहे. या फोटोशूटचे काही मिनी व्हिडीओदेखील तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. व्हिडीओमधील ईशाची बिकिनीमधील अदा तिच्या चाहत्यांना खूपच भावत आहेत. त्यामुळे सध्या या फोटोंना चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.