SEE HOT PIC : शिबानी दांडेकरने केले बोल्ड फोटोशूट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 21:50 IST
सेलेब्स भलेही त्यांच्या रिअल लाइफमध्ये सिंपल आणि सोबर लुकमध्ये राहत असले तरी, रिल लाइफमध्ये त्यांचा जलवा काही औरच असतो. ...
SEE HOT PIC : शिबानी दांडेकरने केले बोल्ड फोटोशूट!!
सेलेब्स भलेही त्यांच्या रिअल लाइफमध्ये सिंपल आणि सोबर लुकमध्ये राहत असले तरी, रिल लाइफमध्ये त्यांचा जलवा काही औरच असतो. कारण ही मंडळी त्यांच्या हॉट अॅण्ड बोल्ड लुकने अशी काही चर्चा घडवून आणतात की, पुन्हा ते लाइमलाइटमध्ये येतात. अशीच काहीशी चर्चा सध्या आयपीएल होस्ट आणि बॉलिवूड गायिका शिबानी दांडेकर हिच्या फोटोशूटची केली जात आहे. शिबानीने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये तिचा अंदाज असा काही दिसत आहे की, तिचे फॅन्स अक्षरश: तिच्या या बोल्ड लुकवर फिदा झाले आहेत. शिबानीने नुकतेच मॅक्सिम इंडियासाठी फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती टॉपलेस होताना दिसत आहे. बहुतेक फोटोंमध्ये शिबानी शार्ट्समध्ये असल्याने तिचा लुक खूपच बोल्ड दिसत आहे. बहुतेक फोटोंमध्ये शिबानीने ब्लॅक कलरचे आउटफिट्स वियर घातलेले आहेत. शिवाय तिची हेअरस्टाइलही खूपच सुंदर दिसत आहे. यातील काही फोटोज् तिने इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने सध्या शिबानी चर्चेत आली आहे. कारण इंटरनेटवर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात बघितले जात आहेत. शिबानीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली आहे. शिवाय ती एक उत्कृष्ट गायिकाही आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या आगामी ‘नूर’मध्ये शिबानी बघावयास मिळणार आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या अक्षय कुमार आणि तापसी पन्नू स्टारर ‘नाम शबाना’मध्ये शिबानी एका स्पेशल गाण्यावर डान्स करताना बघावयास मिळाली होती. दररम्यान शिबानीच्या या हॉट अॅण्ड बोल्ड फोटोशूटनी सध्या धूम उडवून दिली असून, शिबानीचा हा अवतार तिच्या फॅन्सना प्रचंड भावत आहे. त्याचबरोबर बी-टाउनमध्ये शिबीनीचे हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. फोटो सौजन्य : मॅक्सिम इंडिया