Join us

सारा अली खानला किरकोळ भाजलं, शायराना अंदाजात सांगितला घडलेला प्रसंग; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 18:18 IST

'ही काय मुलगी आहे यार' असं म्हणत नेटकरी साराच्या प्रेमातच पडलेत.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या चुलबुल्या अंदाजमुळे ओळखली जाते. तिचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. 'मर्डर मुबारक' आणि 'ए वतन मेरे वतन' या सिनेमांचा समावेश आहे. सध्या सारा दोन्ही सिनेमांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारा मजेशीर अंदाजात शायरीही करते हे तर सगळ्यांनाच माहित आहे. नुकतीच तिला दुखापत झाली असून तिने ही माहिती देखील शायरीमधूनच दिली. सारा चा हाच स्वभाव चाहत्यांना नेहमीच भावतो. 

सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मेकअपरुममध्ये आहे आणि तिच्यासोबत तिचे स्टायलिस्ट आहेत. तिची एक सहकारी साराची तक्रार करत आहे. "साराचं पोट भाजलं आहे आणि ही अजिबातच गंमतीची गोष्ट नाही' असं ती म्हणताना दिसते. तेव्हा सारा म्हणते, जेव्हा तुम्ही दोन सिनेमांचं प्रमोशन करत आहात तेव्हा असं काहीतरी होणारच. आता काय करणार माझं पोट भाजलं, मला उशीर झाला, आता सगळ्यांना माझी वाट बघावी लागणार. माझ्या सहकारीला वाईट वाटतंय कारण मला खूप भाजलंय."

साराच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत 'मेहनती मुलगी' असे लिहिले आहे. 'ही काय मुलगी आहे यार' असं म्हणत नेटकरी तिच्या प्रेमातच पडले आहेत. साराचे दोन्ही चित्रपट ओटीटीवरच रिलीज होणार आहेत. दोन्हीचे ट्रेलर आले असून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. शिवाय सारा 'मेट्रो इन दिनो' चंही शूट करत आहे. यामध्ये ती आदित्य रॉय कपूरसोबत झळकणार आहे.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसोशल मीडिया