अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नुकतीच 'मेट्रो इन दिनो'मध्ये दिसली. सिनेमात तिची आदित्य रॉय कपूरसोबतची केमिस्ट्री सगळ्यांना आवडली. खऱ्या आयुष्यात सारा कोणाला डेट करतीये माहितीये का? नुकतीच ती कथित बॉयफ्रेंडसोबत रात्री उशिरा गुरुद्वारामध्ये गेली होती. तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सारा अली खान सध्या अर्जुन प्रताप बाजवासोबत(Arjun Pratap Bajwa) रिलेशनशिपमध्ये आहे अशी चर्चा आहे. काल रात्री उशिरा दोघंही गुरुद्वारातून बाहेर पडताना दिसले. कारकडे जाताना त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, प्लाझो आणि डोक्यावर ओढणी असा साराचा लूक आहे. यानंतर अर्जुन प्रताप बाजवा कॅज्युअल लूकमध्ये दिसतोय. त्याने डोक्यावर रुमाल बांधला आहे. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंट करत लिहिले,'सुंदर जोडी'. तर काहींनी साराच्या प्रायव्हसीवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधीही दोघं सोबत दिसले आहेत. त्यांनी केदारनाथचं दर्शन केल्याचा व्हिडिओही काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. कार्तिक आर्यनशी ब्रेकअप झाल्यापासूनच साराचं नाव अर्जुनशी जोडलं गेलं आहे.
कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा?
अर्जुन प्रताप बाजवा हा पंजाबमधील राजकीय नेते फतेह जंग सिंह बाजवा यांचा अर्जुन हा मुलगा आहे. फतेह जंग सिंह हे सध्या पंजाबमधील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अर्जुन हा एक प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे.