Sara Ali Khan Rents Out Mumbai Andheri West Bungalow : बॉलिवूड स्टार्स चित्रपट आणि जाहिरातींमधून काम करून कोट्यवधी पैसे कमवतात. परंतु काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कमाईचा स्रोत फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही. अनेक कलाकार आपली मालमत्ता भाड्याने दिल्यामुळे दर महिन्याला चांगली कमाईही करतात. मुंबईतील वाढत्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आणखी एका सेलिब्रिटीने गुंतवणूक करत उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या व्यावसायिक कौशल्यामुळेही चर्चेत आली आहे. साराने मुंबईतील आपला एक अतिशय महागडा आणि आलिशान बंगला भाड्याने दिला आहे. या व्यवहारातून तिला पुढील पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. विशेष म्हणजे, साराचा हा बंगला एका नामांकित शैक्षणिक संस्थेला देण्यात आला आहे.
सारा अली खानचा हा बंगला मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील ओल्ड लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील 'बेलस्कॉट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी'मध्ये स्थित आहे. CRE Matrix च्या कागदपत्रांनुसार, अंदाजे ४,५०० चौरस फूट पसरलेली ही जागा साराने 'प्रॉडिजी मॉन्टेसरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या संस्थेला भाड्याने दिली आहे. भाडेकरू या जागेचा वापर शाळेशी संबंधित उपक्रमांसाठी करणार आहे. या व्यवहारासाठी भाडेकरूने २० लाख रुपयांची सुरक्षा ठेव देखील जमा केली आहे.
असे असेल भाड्याचे गणित
हा करार १ मे २०२६ पासून लागू होणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी या मालमत्तेचे एकूण मूल्य ४.१४ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. साराच्या या मालमत्तेचे मासिक भाडे सुरुवातीला ६.५ लाख रुपये इतके असेल. कराराच्या अटींनुसार, तिसऱ्या वर्षापासून दरवर्षी ५% वाढ होणार आहे.
पहिली २ वर्षे: दरमहा ६.५ लाख रुपयेतिसरे वर्ष: दरमहा ६.८२ लाख रुपयेचौथे वर्ष: दरमहा ७.१६ लाख रुपयेपाचवे वर्ष: दरमहा ७.५२ लाख रुपये
Web Summary : Sara Ali Khan leased her Mumbai bungalow in Andheri West to a school for five years. The deal fetches ₹6.5 lakh monthly rent, escalating 5% yearly. Total value: ₹4.14 crore.
Web Summary : सारा अली खान ने अंधेरी वेस्ट, मुंबई में स्थित अपना बंगला एक स्कूल को पांच साल के लिए किराए पर दिया। इस सौदे से उन्हें ₹6.5 लाख मासिक किराया मिलेगा, जो हर साल 5% बढ़ेगा। कुल मूल्य: ₹4.14 करोड़।