Join us  

मुंबई एअरपोर्टवर मीडियाची गर्दी पाहून सारा अली खानची उडाली भंबेरी, लगेच केलं 'हे' काम...

By अमित इंगोले | Published: September 25, 2020 10:14 AM

मुंबईच्या एअरपोर्टवर सारा अली खानला मीडियाने घेरा घेतला. तेव्हा तिच्या टीमने मागच्या गेटने बाहेर  पडण्याचा निर्णय घेतला.

सुशांत सिंह राजपूत केसमधून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या हाती असे बॉलिवूड स्टार्स लागलेत जे अनेक वर्षांपासून ड्रग्सचं सेवन करत आहेत. ड्रग्स केसप्रकरणी एनसीबीने सारा अली खान हिलाही समन्स पाठवला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सारा अली खान गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होती. काही वेळापूर्वीच सारा अली खान भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंहसोबत मुंबईत पोहोचली. मुंबई एअरपोर्टवर येताच मीडियाची गर्दी पाहून सारा अली खानची भंबेरीच उडाली.

मुंबईच्या एअरपोर्टवर सारा अली खानला मीडियाने घेरा घेतला. तेव्हा तिच्या टीमने मागच्या गेटने बाहेर  पडण्याचा निर्णय घेतला. सारा अली खानला २६ सप्टेंबरला एनसीबीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर रहायचं आहे.

'रियाने कुणाचीच नावे घेतली नाहीत'

नुकतेच ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरोच्या चौकशीत बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्रींचे नाव समोर आले आहे. सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंगला समन्स बजावला आहे.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, यादरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी दावा केला आहे की ड्रग प्रकरणात रियाने कुणाचेच नाव घेतले नव्हते. एनसीबीचे सर्व दावे खोटे ठरले आहेत. रियाने चौकशीत कुणाचेच नाव घेतले नाही. जर एनसीबी किंवा कुणी दुसरे तिचे स्टेटमेंट लीक करत असेल तर ते पूर्ण चुकीचे आहे. रिया चक्रवर्तीने कुणाचे नाव घेतलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सतीश मानशिंदे पुढे म्हणाले की, जया साहाचे सुशांत व रियासोबतचे चॅट होते ते केवळ सीबीडी ऑईल प्रिस्क्राइब करणे किंवा पाठवायचे होते जे गांज्याच्या पानांचा अर्क आहे. ते कोणते ड्रग्स नाही. तुम्ही सीबीडी बॉटल पाहू शकता ज्यात ड्रग्स संबंधीत कोणतीच गोष्ट नाही.

'हिरोंची नावे समोर येणं बाकी'

ड्रग्ज प्रकरणात रियाच्या अटकेनंतर आणखी बरीच बॉलिवुडसंबंधित नावे पुढे आली आहेत, परंतु विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त बॉलिवूड अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. याबाबत वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्न या प्रकरणात अद्याप बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे उघड झाली नाहीत, आतापर्यंत केवळ अभिनेत्रींची नावे उघडकीस आली आहेत.

उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. हे हसीस, गांजा आणि या सर्व गोष्टींसंबंधित चर्चा कोठून आली आहे, असं उज्जल निकम सांगतात. बॉलिवूड गँगवर बोलताना ते म्हणाले की, "दुबईत बसलेल्या काही लोकांच्या मदतीने काही बॉलिवूडमधील लोकं आपलं अस्तित्व बनवायचे .त्यानंतर बॉलिवूडमधील लोक विचार करू लागले की, कोणीही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही.", अशी माहिती एबीपी न्यूजने दिली आहे. 

हे पण वाचा :

एनसीबीऐवजी सीबीआयने तपास करावा; रियाची मागणी

गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

दीपिका पादुकोण तुरूंगात जाणार! ड्रग्स प्रकरणी चौकशीआधीच केआरकेने केली भविष्यवाणी!

टॅग्स :सारा अली खानअमली पदार्थबॉलिवूड