Join us
Daily Top 2Weekly Top 5

साराला पाहताच चाहत्यांचा गराडा, तर सारासाठी कार्तिकच बनला बॉडीगार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 20:07 IST

व्हिडीओत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमध्ये सुरक्षारक्षक असतानाही कशा प्रकारे कार्तिकने साराला बाहेर काढले आहे, ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सेलिब्रेटी जिथं जातात त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा जमा होतो. त्यामुळे कधी कधी सेलिब्रेटींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.नुकतेच सारा अली खानला पाहताच चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली होती. मात्र यावेळी साराच्या मदतीला कार्तिक आर्यन धावून आला. या गर्दीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमध्ये सुरक्षारक्षक असतानाही कशा प्रकारे कार्तिकने साराला बाहेर काढले आहे, ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

'लव आज कल'च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. सारा अली खान आणि  कार्तिक आर्यन ही जोडी झळकणार आहे. तसेच सिनेमाच्या शूटिंगवेळीही दोघेही एकत्र वेळ घालवायचे. शूटिंग संपल्यानंतरही दोघे एकत्र एन्जॉय करताना पाहायला मिळतात. रोज या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. या दोघांचे सोशल मीडियावर चाहतेही प्रचंड असल्यामुळे  चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो. 

'कॉफी विद करण' या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय. शिवाय लवकरच मिंगल व्हायला आवडेल हे सांगायलाही तो विसरला नाही. सारा आणि कार्तिक  स्थिरावत नाही तोच वेगवेगळ्या कारणांमुळे ते  दोघेही चर्चेत असतात.  रोज दोघांच्या बॉन्डिंग विषयीच्या चर्चा ऐकायला मिळतात.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन