Join us
Daily Top 2Weekly Top 5

सध्या सारा अली खान काय करते, पाहा या फोटोत आहे तुमचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 16:50 IST

एका व्हिडीओत ती तेथील दुकानांबद्दल माहिती सांगते. तिथे तिने शॉपिंगचाही आनंद लुटल्याचे पाहायला मिळते. विविध रंगाच्या बांगड्या तिने चाहत्यांना दाखवत असल्याचे पाहायला मिळते.

अभिनेत्री सारा अली खान सध्या आई अमृता सिंहसह वारानसीमध्ये आहे. तिथे तिने  आईसह गंगा आरतीही केली. मोठ्या भक्ती भावाने सारा गंगा आरती करताना पाहायला मिळाली.व्हिडिओद्वारे तिने तिच्या चाहत्यांना गंगा आरतीबद्दल आणि तिथील काही वैशिष्ट्य सांगितले.  वाराणसीच्या रस्त्यांवरुन सारा दिलखुलास फिरली. हा खूप गर्दीचा रस्ता दिसतोय.

 

विशेष म्हणजे तिथे तिला फारसे कोणी ओळखत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे अडथळा तिला तिथे जाणवला नाही. एका व्हिडीओत ती तेथील दुकानांबद्दल माहिती सांगते. तिथे तिने शॉपिंगचाही आनंद लुटल्याचे पाहायला मिळते. विविध रंगाच्या बांगड्या तिने चाहत्यांना दाखवत असल्याचे पाहायला मिळते. 

सारा सध्या वाराणसीमध्ये आहे, जिथे ती दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी 'अतरंगी-रे' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासह धनुष आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित होणार आहे. तिचे हे व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही तिची चिंताही सतावत आहे तिला जास्त बाहेर गर्दीच्या ठिकाणी न फिरण्याचाही सल्ला ते देत आहेत. तर काही युजर्सने वाराणसीमध्ये तिला कोणीच कसे ओळखले नाही ? यावरही आश्चर्यव्यक्त केले आहे.   

टॅग्स :सारा अली खानअमृता सिंग