Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्राम पुरस्कारांमध्ये ‘देसी गर्ल’ आणि बॉलीवुडच्या ‘मस्तानी’ची बाजी, सारा अली खाननंही पटकावला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 11:46 IST

इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. नुकतंच इन्स्टाग्रामकडून काही पुरस्कार जाहीर झालेत.

सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. सोशल मीडियापैकी इन्स्टाग्राम हे अनेक सेलिब्रिटींचं आवडतं अॅप आहे . इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. नुकतंच इन्स्टाग्रामकडून काही पुरस्कार जाहीर झालेत. 

देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्राला सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘स्टोरीटेलर ऑफ द इअर’चा पुरस्कार बॉलीवुडची मस्तानी दीपिका पादुकोण हिनं पटकावला आहे.

विशेष म्हणजे नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा अली खानने यात बाजी मारली आहे. छोटे नवाब सैफ अली खानची लेक असलेल्या साराला ‘राइसिंग स्टार अॅवॉर्ड’ मिळाला आहे. इन्स्टाग्रामवर ‘देसी गर्ल’चे सुमारे ४ कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘मोस्ट फॉलोअड अकाऊंट’ असलेली प्रियंका इन्स्टाग्रामवर विविध फोटो पोस्ट करत असते. 

‘स्टोरीटेलर ऑफ द इअर’चा पुरस्कार मिळवलेली दीपिका इन्स्टाग्राम फोटो, इन्स्टा स्टोरी, चॅट या माध्यमातून फॅन्सशी कनेक्ट असते. जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी फॅन्सशी शेअर करण्यासाठी, हसण्यासाठी इन्स्टाग्रामवर आहे. फॅन्सकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी खूप खूप आभारी आहे अशा शब्दांत दीपिकाने पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या वर्षात मी आणखी बऱ्याच गोष्टी, घडामोडी इन्स्टाग्रामद्वारे मी शेअर करणार असल्याचंही दीपिकाने म्हटले आहे. 

टॅग्स :सारा अली खानदीपिका पादुकोणप्रियंका चोप्रा