Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफच्या लेकीने शेअर केलेत आत्तापर्यंतचे सर्वात Bold फोटो, पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 12:07 IST

 तूर्तास सारा कामातून ब्रेक घेऊन आई व भावासोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती.

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खानचा दमदार डेब्यू झाला. पाठोपाठ अनेक सिनेमेही मिळालेत. सारा आता सैफ-अमृताची मुलगी म्हणून नाही तर बॉलिवूडची स्टार म्हणून ओळखली जाते. सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण केली. लवकरच सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.  तूर्तास सारा कामातून ब्रेक घेऊन आई व भावासोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. या व्हॅकेशनचे काही फोटो साराने शेअर केले आहेत.

हे साराचे आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो आहेत, असे म्हणायलाही हरकत नाही. कारण या फोटोत ती हॉट बिकिनीत दिसत आहे.या फोटोत सारा ब्ल्यू येलो रेड बिकिनीत दिसतेय.

यापूर्वी कधीही साराने बिकिनीतील फोटो शेअर केले नाहीत. साराच्या या बोल्ड फोटोंवर तूर्तास लाईक्सचा वर्षाव होतोय.

सध्या सारा  ‘कुली नंबर वन’च्या रिमेकचे शूटींग करतेय. या चित्रपटात तिच्या अपोझिट वरूण धवन दिसणार आहे. याशिवाय तिचा आणि  कार्तिक आर्यनसोबत ‘लव आजकल 2’ हा सिनेमाही येत्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले आणि सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीला ब्रेक लागला.

काही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती.  कार्तिक व सारा आपआपल्या प्रोजेक्टमध्ये इतके बिझी आहेत की एकमेकांना वेळ देणे त्यांना अशक्य झाले होते.

‘लव्ह आज कल 2’चे शूटींग संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी नाही नाही तो खटाटोप केला. पण बिझी शेड्यूल या दोघांच्या रोमान्सच्या आड आले. 

टॅग्स :सारा अली खान