Join us
Daily Top 2Weekly Top 5

साजिद नाडियाडवालाने पूर्ण केले साराला दिलेलं वचन, 'या' बिग बजेट सिनेमाची दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 15:20 IST

रिपोर्टनुसार साराला तिची भूमिकादेखील आवडली आहे

गेल्या काही दिवसांपासून अशी बातमी आली होती की निर्माता साजिद नाडियाडवालाने सारा अली खानला घेऊन 'हीरोपंती 2' बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुशांत सिंग राजपूत संबंधित असलेल्या ड्रग चॅट प्रकरणात एनसीबीने सारा अली खानला समन्स बजावल्यामुळे साराचे नाव सिनेमातून काढून टाकण्यात आले. 

 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, साजिदने सारा अली खानला आपल्या सिनेमात घेण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. तिला आणखी एक मोठा सिनेमा ऑफर केला. टायगर श्रॉफसह सारा अली खानला 'बागी 4' मध्ये कास्ट केल्याची बातमी आहे. साजिदने सिनेमातील फिमेल  लीडसाठी साराचे नाव फायनल केले आहे. खरं तर साराला 'हिरोपंती 2' मध्ये घ्यायचा होता पण तारा सुतारियाला तिच्या जागी घेण्यात आले.

रिपोर्टनुसार साराला तिची भूमिकादेखील आवडली आहे आणि आता तिची टीम सिनेमाच्या शूटिंगसाठी तारखा घेणार आहे. टायगर श्रॉफ 'हीरोपंती 2' चे शूटिंग पूर्ण होताच 'बागी 4' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. साराने नुकताच तिच्या 'अतरंगी रे' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. विकी कौशलसमवेत 'द अमर अश्वत्थामा' आणि दिनेश विजानाच्या सिनेमाचे शूटिंग अजून पूर्ण केले नाही. चाहते या नवीन जोडीला पडद्यावर पाहण्याची वाट पाहत असतील.

टॅग्स :सारा अली खान