Join us
Daily Top 2Weekly Top 5

​संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त हिने रेड बिकनीत लावली आग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 15:06 IST

संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सध्या सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसते आहे. होय, दत्त कुटुंब सध्या युरोपात सुट्टीचा ...

संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सध्या सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसते आहे. होय, दत्त कुटुंब सध्या युरोपात सुट्टीचा आनंद घेतेयं. पण त्यांच्या मिनिटा-मिनिटाचे अपडेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे. या अपडेटमध्ये सगळ्यांत लक्षवेधी काय आहे तर, ते मान्यता दत्तचे हॉट फोटो. होय, स्वत:चे बिकनीतील एकापेक्षा एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचा सपाटाच मान्यताने चालवला आहे.मान्यताचा ताजा फोटो तर पावसाळ्यात आग लावणारा आहे. होय, मान्यताने रेड बिकनीतील एक फोटो शेअर केला आहे. यात ती अतिशय हॉट दिसतेय. तिचे हे हॉट लूक बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकेल असे आहे. अर्थात मान्यताने पहिल्यांदा बिकनीतील फोटो शेअर केलेला नाहीय. जेव्हापासून युरोपात गेली अगदी त्यादिवसापासून ती हे फोटो शेअर करत आहेत.ALSO READ : ​असा संजय दत्त तुम्ही कधीच पाहिला नसेल!३७ वर्षांच्या मान्यताने २००८ मध्ये संजय दत्तशी लग्न केले होते. सध्या तील संजय दत्तच्या प्रॉडक्शन कंपनीची सीईओ आहे. संजय व मान्यता या दोघांना दोन मुले आहे. मुलगा शहरान व मुलगी इकरा. लग्नापूर्वी मान्यता सी ग्रेड चित्रपटांत काम करत होती. अजय देवगणच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात तिने एक आयटम साँग केले होते.मान्यता संजयची तिसरी पत्नी आहे. दोघांच्याही वयात सुमारे २० वर्षांचे अंतर आहे. संजयची पहिली पत्नी होती, ऋचा शर्मा. तिचे निधन झाल्यानंतर संजयने रिया पिल्लईसोबत दुसरा संसार थाटला होता. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर संजयच्या आयुष्यात मान्यता आली. घरच्यांच्या विरोधात जात संजयने मान्यताशी लग्न केले. सध्या दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.