बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत जे त्यांच्या पालकांसारखेच लाइमलाइटमध्ये राहतात. पण अजूनही काही मोठ्या स्टार्सची मुले लाइमलाइटपासून दूर राहतात. यामध्ये संजय दत्त(Sanjay Dutt)ची मुले देखील आहेत. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा संजय दत्त खऱ्या आयुष्यातही आपल्या कुटुंबाला लाइमलाइटपासून दूर ठेवतो. संजय दत्तचे कुटुंब दुबईमध्ये राहते, जिथे तो अनेकदा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी जातो. संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांच्याप्रमाणेच त्याची मुलेही ग्लॅमरस जगापासून दूर राहतात. पण अलीकडेच हा अभिनेता त्याच्या कुटुंबासोबत दिसला, त्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
खरेतर संजय दत्त नुकताच त्याची मुलगी इकरासोबत एका लग्न समारंभाला गेला होता, ज्याचे फोटो गायक सोनू निगमने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तो अभिनेता आणि इतरांसोबत नाचताना दिसत आहे. दोन फोटोंमध्ये संजय दत्त त्याची लाडकी इकरासोबत दिसत आहे.
इकरा दत्त तिच्या वडिलांसोबत बसली आहे. गुलाबी रंगाच्या पारंपारिक पोशाखात इकरा खूप सुंदर दिसते आहे. तिचा बदललेला लूक पाहून लोक चकित झाले आहेत. फोटो पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, छोटी इकरा इतक्या लवकर मोठी झाली आहे. २१ ऑक्टोबर २०१० रोजी जन्मलेली इकरा सध्या १४ वर्षांची आहे.
संजय दत्तची झालीत तीन लग्नसंजय दत्तने एक-दोन नाही तर तीन लग्न केली आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव रिचा शर्मा होते, जिच्याशी त्याने १९८७ मध्ये लग्न केले. १९९६ मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे तिचे निधन झाले. अभिनेत्याला रिचापासून त्रिशला नावाची एक मुलगी आहे. ती तिच्या आजी-आजोबांसोबत अमेरिकेत राहते. दरम्यान, संजय दत्तने १९९८ मध्ये रिया पिल्लईशी दुसरे लग्न केले. जे फक्त १० वर्षे टिकले. त्यांचे तिसरे लग्न २००८ मध्ये मान्यता दत्तसोबत झाले, ज्यांच्यापासून त्यांना दोन जुळी मुले आहेत शहरान आणि इकरा.