Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्रिशलाने संजय दत्तला अंकल म्हणून हाक मारल्यानंतर त्याची झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:42 IST

संजय दत्तने मुलाखतीत सांगितले होते की, एकदा माझी मुलगी त्रिशलाने मला अंकल म्हणून हाक मारली होती.

ठळक मुद्देत्रिशालाच्या मी समोर नसताना माझ्या आठवणी तिच्या मनात ताज्या ठेवण्याची जबाबदारी ऋचाची होती. पण तिने तसे केले नाही. मी तुझ्या जागी असतो, तर असे केले नसते असे देखील त्याने सांगितले होते.

संजय दत्तचा कलंक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संजय सोबतच आलिया भट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांना अनेक वर्षांनी एकत्र पाहाता येणार आहे. त्या दोघांनी साजन, खलनायक यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचसोबत त्या काळात त्या दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

संजय दत्त आणि माधुरीची ओळख झाली, त्यावेळी संजयचे लग्न ऋचा शर्मासोबत झाले होते आणि त्यांना त्रिशला ही मुलगी होती. ऋचाच्या बहिणीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते की, संजू माधुरीच्या प्रेमात इतका वेडा झाला होता. की कॅन्सरग्रस्त पत्नीला आणण्यासाठी तो एअरपोर्टला देखील गेला नव्हता. कलंक या चित्रपटाच्या निमित्ताने संजयची एक जुनी मुलाखत मीडियात व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत ऋचा आणि त्याच्या घटस्फोटाबाबत त्याने सांगितले आहे. ऋचा आणि तो वेगळे व्हायला ऋचाच जबाबदार असल्याचे देखील त्याने यात म्हटले आहे. 

संजय दत्तने मुलाखतीत सांगितले होते की, एकदा माझी मुलगी त्रिशलाने मला अंकल म्हणून हाक मारली होती. त्यावेळी मला ऋचाचा प्रचंड राग आला होता. मी तिला त्याबद्दल विचारले देखील होते. त्रिशालाच्या मी समोर नसताना माझ्या आठवणी तिच्या मनात ताज्या ठेवण्याची जबाबदारी ऋचाची होती. पण तिने तसे केले नाही. मी तुझ्या जागी असतो, तर असे केले नसते असे देखील त्याने सांगितले होते. एवढेच नव्हे तर ऋचा रुग्णालयात असताना त्रिशालाचे काय करायचे असे तिच्या आई-वडिलांनी मला विचारले होते. त्यावर ऋचा जिवंत असताना तुम्ही असे का बोलत आहात असे मी त्यांना बोललो होतो. 

ऋचाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्यानंतर काहीच वर्षांनी संजयने रिया पिल्लईसोबत लग्न केले होते. त्याचे आणि रियाचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर त्याने मान्यतासोबत तिसरे लग्न केले. त्या दोघांना शाहरान आणि इकरा अशी दोन मुले आहेत तर त्रिशाला सध्या तिच्या शिक्षणासाठी बाहेरगावी असते.

टॅग्स :संजय दत्त