Join us

भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:13 IST

संजय दत्तचा महाकालेश्वर मंदिरातील व्हिडिओ समोर

अभिनेता संजय दत्तने नुकतंच उज्जैन महाकालेश्वर येथे महादेवाचं दर्शन घेतलं. नवरात्री उत्सवादरम्यान संदय दत्तने मंदिरात विधिवत पूजा केली. तसंच भस्म आरतीतही सहभाग घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय दत्त महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसत आहे.

संजय दत्तने भगवा कुर्ता घातला आहे. खांद्यावर गुलाबी रंगाचं उपरणं आहे. गाभाऱ्यात महादेवाची भस्म आरती सुरु असताना संदय दत्त नंदी हॉलमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या मागे लोकांची तुडूंब गर्दी आहे. संजय दत्तनेही भस्म आरतीत सहभाग घेतला आणि महादेवाचा आशीर्वाद घेतला. 

संजय दत्त नुकताच 'बागी ४' सिनेमात दिसला. आता तो आगामी 'धुरंधर'मध्ये दिसणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात संजूबाबसोबत रमवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर माधवन, अक्षय खन्ना अशी तगडी फौज आहे. याशिवाय संदय दत्त सलमान खानसोबतही आगामी एका सिनेमात काम करणार आहे. 'द राजा साब','केडी-द डेविल'हे देखील त्याचे सिनेमे रांगेत आहेत. तसंच संजय दत्तचा हॉटेलचा व्यवसायही आहे. तो पत्नी आणि मुलांसोबत दुबईत स्थायिक आहे. त्याची पत्नी मान्यताचा तिथे बिझनेस असून मुलांचं शिक्षणही दुबईतच होत आहे.

मध्य प्रदेशमधील उज्जैन महाकालेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी शिवलिंग स्वयंभू प्रकट झाल्याची असं म्हणतात. त्यामुळे इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मध्य प्रदेशात आणथी एक ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे ओंकारेश्वर. हे महाकालेश्वरपासून १४० किमी अंतरावर आहे. शिप्रा नदीच्या तटावर हे मंदिर आहे.  

English
हि�~Bद�~@ सारा�~Bश
Web Title : Sanjay Dutt visits Mahakaleshwar, immersed in devotion during Navratri.

Web Summary : Sanjay Dutt visited Ujjain's Mahakaleshwar temple during Navratri, participating in prayers and the Bhasma Aarti. Dressed in saffron, he was seen absorbed in devotion. He has several films lined up and resides in Dubai with his family.
टॅग्स :संजय दत्तमध्य प्रदेशमंदिर