Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बस करा बे…" फोटो घेणाऱ्या पापाराझींवर संजय दत्त अचानक भडकला, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:12 IST

संजय दत्त याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या बॉक्स ऑफिसवर नव-नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने साकारलेली 'चौधरी अस्लम' ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. यातच आता सोशल मीडियावर संजय दत्त याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संजय दत्त हा पापाराझींवर संतापलेला दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी संजय दत्त याच्यासोबत त्याची पत्नी मान्यता दत्त ही देखील दिसत आहे. 

संजय दत्त अलीकडेच पत्नी मान्यता दत्त आणि जुळी मुलं शाहरान व इकरा यांच्यासोबत मुंबईत डिनरसाठी बाहेर पडला होता. संजय दत्तला पाहताच अचानक पपाराजींची गर्दी झाली. यावेळी फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या पापराझींवर "बस करा बे…" असं म्हणत तो रागवताना दिसला. यानंतर थेट रेस्टॉरंटमध्ये गेला. डिनरनंतर बाहेर पडतानाही पुन्हा तोच प्रकार घडला. कॅमेऱ्यांनी वेढा घातल्यावर संजयचा संयम सुटला आणि तो चिडून म्हणाला, "अरे भाऊ, दोन मिनिटं बंद कर, झालं आता". या वेळी तो पत्नीचा हात धरून चालताना दिसला.

संजय दत्त याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 'धुरंधर २'नंतर संजय दत्त 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यानं या ऐतिहासिक चित्रपटात अफजल खानाची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, तो १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय संजय दत्त हा 'बाप' आणि 'केडी द डेविल' या सिनेमांमध्येही दिसणार आहे. दरम्यान, अलिकडेच त्यांच्या नोरा फतेही सोबतच्या 'केडी द डेविल' चित्रपटातील गाण्यावरूनही काही वाद निर्माण झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Dutt Loses Cool: Snaps at Paparazzi, Asks Them to Stop

Web Summary : Sanjay Dutt, accompanied by his family, recently flared up at paparazzi during a dinner outing in Mumbai. Irritated by the constant flashing cameras, Dutt was seen telling them to stop, expressing his annoyance before entering a restaurant and later, leaving with his wife.
टॅग्स :संजय दत्त