सागरिकाने काल गुरुवारी मालदीवमधला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत जहीर दिसतोय. सागर किनारी नेटवर तो पहुडलेला आहे. सागरिकाने जहीरचा हा फोटो पोस्ट केला आणि काहीच क्षणात कमेंट्सचा पाऊस पडायला लागला. सानियाने या फोटोवर कमेंट दिली ‘जहीर कदाचित एकट्यानेच हनीमून साजरा करतोय....,’ असे तिने लिहिले. सानियाची ही कमेंट्स पाहून सागरिका आणि जहीर दोघेही लाजून लाजून चूर झाले नसतील तर नवल. कारण अद्याप सागरिकाने या सानियाच्या या कमेंट्सवर कुठलेही उत्तर दिलेले नाही.
ALSO READ : INSIDE VIDEO : जहीर खान व सागरिका घाटगेच्या ग्रॅण्ड रिसेप्शनमध्ये विराट व अनुष्काचा जलवा! विराटने केला धम्माल डान्स!!
२३ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकेलेले सागरिका आणि जहीर यांनी २६ नोव्हेंबरच्या रात्री आपल्या मित्र मंडळींसाठी कॉकटेल पाटीचे आयोजन केले होते. यानंतर २७ नोव्हेंबर रोजी कुलाब्याच्या ताज पॅलेसमध्ये या दोघांचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पाडले.सागरिका आणि जहीरची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडने करुन दिली होती. दोघे एकमेकांना जवळपास एक दीड वर्ष डेट करत होते. मात्र याची भनकही कोणाला लागली नव्हती. त्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणी या दोघांना एकत्र पाहण्यात आले आणि यांच्या नात्याबाबत चर्चा सुरु झाली होती. युवराज आणि हेजलच्या लग्न समारंभात जहीर आणि सागरिका एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चचेर्ला उधाण आले होते. अखेर या चर्चांचा जहीरने पूर्णविराम देत तो सागरिकासोबत एंगेज असल्याचे जाहिर केले होते.