Join us

‘जुडवा २’ साठी सलमानला जॉईन करणार करिश्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:24 IST

सुपरस्टार अभिनेता सलमान खान आणि बॉलिवूडची लोलो करिश्मा कपूर यांचा १९९७ चा ‘जुडवा’ चित्रपट आठवतोय ना? धम्माल, कॉमेडी, मजा, ...

सुपरस्टार अभिनेता सलमान खान आणि बॉलिवूडची लोलो करिश्मा कपूर यांचा १९९७ चा ‘जुडवा’ चित्रपट आठवतोय ना? धम्माल, कॉमेडी, मजा, मस्ती असा पॅकेज असलेल्या ‘जुडवा चित्रपटात सल्लूमियाँ आणि लोलोची जोडी अप्रतिम होती. या जोडीवर प्रेक्षकांनी तुफान प्रेम केलं. ‘दुनिया मैं आई हो तो लव्ह करलो, थोडासा जिलों थोडा थोडा मरलो’ हे गाणं आजही जुडवा म्हटलं की, तरूणांच्या ओठावर येतं. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘जुडवा २’ मध्ये केमिओ रूपात दिसणार आहे.                                                                               ‘जुडवा’ तील जोडी सलमान खान आणि करिश्मा कपूर करिश्मा कपूर संजय कपूरसोबतच्या घटस्फोटप्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची संधी शोधतच होती. त्यातच तिला जुडवा २ मधील केमिओ रोलची आॅफर आली. मग ती अशी संधी का सोडणार? या चित्रपटात वरूण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. साजिद नादियाडवाला आणि डेव्हिड धवन निर्मित हा कॉमेडी चित्रपट पुढील वर्षी चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. वरूण धवनसाठी हा चित्रपट म्हणजे होम प्रोडक्शन असले तरीही त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. सुपरस्टार सलमान खानने हा चित्रपट ज्या उंचीवर नेऊन ठेवला आहे त्यापेक्षा जास्त उंची गाठणे त्याच्याकडून अपेक्षित आहे. पाहूयात तरूणाईला ‘जुडवा २’ कितपत भावतो ते!