Join us
Daily Top 2Weekly Top 5

​...अखेर सलमान करणार लग्न; तारीखही झाली निश्चित ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 15:25 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या लग्नाची उत्सुकता त्याच्या जगभरातील चाहत्यांना होती. अखेर ही उत्सुकता आता संपणार असून सलमान खान लवकरच ...

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या लग्नाची उत्सुकता त्याच्या जगभरातील चाहत्यांना होती. अखेर ही उत्सुकता आता संपणार असून सलमान खान लवकरच लग्न करणार असून लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे की, सलमाने २९ आॅगस्ट रोजी एका पार्टीत ‘१८ नोव्हेंबर’ रोजी लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. सलमानच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये असतो. म्हणून नोव्हेंबरमध्ये सलमान लग्न करणार, असं त्याने स्वत: जाहीर केलं होतं.  सलमान युलिया वंतूर सोबत लग्न करणार असल्याचे समजते. लग्न सोहळ्यात मित्र आणि परिवार असे फक्त १५ ते २० लोक उपस्थित राहणार आहेत. सलमानने लवकरात लवकर लग्न करावे अशी त्याच्या आईचीही इच्छा आहे. त्यामुळेच सलमानने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाहीय. मात्र अधिकृत घोषणेकडे चाहत्यांनी आपले कान टवकारले आहेत.