Join us

​सलमानने शेअर केला, शाहरुखच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक; रिलीज डेटही ठरविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 20:26 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक बॉलिवूडचा ‘दंबग’ सलमान ...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक बॉलिवूडचा ‘दंबग’ सलमान खानने ट्विटरहून शेअर केला आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मी जाहीर केली आहे असे सलमान खाने याने लिहलेय. सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीचे नाव आहे. मात्र त्यात चित्रपटाच्या नावाचा उल्लेख नाही हे विशेष. सलमान खान व शाहरुख खान यांच्यांत मैत्री झाली असून जुण्या वादाला विसरून ते नव्या प्रोजेक्टवर काम करीत असल्याची चर्चा सध्या मीडियात आहे. याच पार्श्वभूमीवर सलमानने शेअर केलेला फोटोमुळे दोघेही जीवलग मित्र झाले आहेत असेच म्हणावे लागेल. मागील काही दिवसांत ते आगामी प्रोजेक्ट एकत्र करण्याचा विचार करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांमध्ये ‘पीर्इंग अफेअर’ असल्याचेही सांगण्यात येत होते. आता सलमानने आपल्या ट्विटरहून फोटो शेअर करताना दोघांत घट्ट मैत्री असल्याचे दर्शविले आहे. सलमानने ट्विट करताना एक फोटो शेअर केला आहे. यात शाहरुख खान व अनुष्का शर्मा दिसत आहेत. यात शाहरुखच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव असून अनुष्का व शाहरुखचे नावही आहे. हा चित्रपट इम्तियाज अलीचा असल्याचेही दिसते. या फोटोमध्ये सर्वांत ठळक अक्षरात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लिहली आहे. हा चित्रपट 11 आॅगस्ट 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे, असे फोटोवरून दिसते. फोटो शेअर करताना सलमान लिहले, ‘‘शाहरुख खानचा चित्रपट येत आहे, मी रिलीज डेट ठरविली केली आहे, नाव तुम्ही ठरवा. बेस्ट लक अनुष्का शर्मा, इम्तियाज अली.’’}}}} ">http://शाहरुख खानने देखील या ट्विटला उत्तर दिले आहे. शाहरुखने लिहले, जब भाईने कमिटमेंट कर दी है तो अब हम कौन होते . रिलीज डेट 11 आॅगस्ट 2017. अब बस टायटल धूंड दो. या दोघांच्या ट्विटरपोस्टवर चाहत्यांचे हजारो लाईक्स मिळत आहेत. इम्तियाज अलीच्या आगामी ‘द रिंग’या चित्रपटात शाहरुख खान व अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असून त्याचे आऊटडोर शूटिंग नुकतेच संपले आहे. मात्र इम्तियाजच्या आगामी चित्रपटाचे नाव त्याच्या चाहत्यांना ठरविण्याचे आवाहन सलमानने केले आहे. यामुळे या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल झाले नाही असे दिसते. वेल आम्ही तर कळविणारच आहोत.