अर्पिताच्या घरची पार्टी अखेरच्या टप्प्यात आली असताना सगळे स्टार्स आपआपल्या घराच्या दिशेने निघू लागले. कॅटरिनाही निघाली. पण सलमान...? त्याला मात्र कुणाची नाही पण कॅटरिनाची जरा जास्तच काळजी वाटू लागली आणि त्याने लगेच त्याचा पाठीराखा म्हणजे बॉडीगार्ड शेराला कॅटच्या मागे पाठवले. कॅटला गाडीपर्यंत सोडून ये, असे फर्मान सलमानने सोडले आणि शेरा कॅटच्या मागे निघाला. त्याने अतिशय अदबीने कॅटला गाडीपर्यंत सोडून दिले.
ALSO READ: सलमान खान व कॅटरिना कैफ आपल्या जुन्या रिलेशनशिपला देणार का दुसरी संधी?
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरची पार्टी असली की, मीडियासोबतच चाहतेही त्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसतात. अशात सलमानची बात म्हटल्यावर चाहत्यांची गर्दी ही आलीच. त्यामुळे सलमानला चिंता वाटणेही साहजिकच आले. चाहत्यांनी कॅटरिना घेरू नये, तिला कुठलाही त्रास होऊ नये, असे सलमानला वाटले. असे नसतेच तर सलमानने स्वत:चा बॉडीगार्ड कॅटरिनाच्या दिमतीला दिला नसताच. सलमान व कॅटरिनाचे ब्रेकअप झाले असले तरीही त्यांच्यातील एक नाजूक धागा अद्यापही कायम आहे. तो अद्यापही तुटलेला नाही, असेच यावरून दिसते.