सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडीओ झाला लीक, इंटरनेटवर व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 21:04 IST
सलमान खानसोबत एका सुपरहिट चित्रपटात झळकलेल्या या अभिनेत्रीचा बाथटबमध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ लीक झाला आहे.
सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा व्हिडीओ झाला लीक, इंटरनेटवर व्हायरल!
बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत एका सुपरहिट चित्रपटात काम करणाºया आणि बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त शोच्या सीजन ८ मध्ये झळकलेली अभिनेत्री महक चहलचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ लीक झाला असून, मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महक बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये कुठल्याही प्रकारचे अश्लील दृश्य नाही. व्हिडीओ बघून एक गोष्ट स्पष्ट होते की, महक कॅमेºयासमोर शॉट देताना दिसत आहे. ती कुठल्यातरी चित्रपटाची शूटिंग करीत असावी, असे लगेचच लक्षात येते. दरम्यान, महक चहल लवकरच अरबाज खान याच्या आगामी ‘निर्दोष’ या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपट रिलीज होण्याअगोदरच महक अशाप्रकारचा व्हिडीओ लीक करून हा पब्लिसिटी स्टंट असावा, अशीही चर्चा रंगत आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ ‘निर्दोष’ या चित्रपटातील असल्याच्या बातम्याही आता समोर येत आहेत. पण काहीही असो, सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महकला त्याची चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटात महक व्यतिरिक्त मंजरी फडनिस, अश्मित पटेल आणि मुकुल देव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रदीप रंगवानी आणि सुब्रतो पॉल यांनी दिग्दर्शित केले आहे. तर यूवी फिल्म्स या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान, महक बिग बॉसच्या सीजन-८मध्ये झळकली होती. त्याचबरोबर ती सलमान खानच्या ‘वॉन्टेड’मध्येही बघावयास मिळाली. महक सलमानच्या क्लोज असून, सलमाननेच तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ती अरबाजच्या चित्रपटात काम करीत असल्याने आता पुन्हा एकदा तिला इंडस्ट्रीत कमबॅकची संधी सलमाननेच दिली असावी, असेही बोलले जात आहे.