Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्नल हूँ भैय्या...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर पाहून ट्रोल करणाऱ्यांना सलमान खानचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:27 IST

हातात बॅट घेतली आणि एकच लूक दिला...सलमान खानने ट्रोलर्सला दिलं उत्तर

सलमान खान लवकरच आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. २०२० साली गलवान खोऱ्यात भारत विरुद्ध चीन संघर्षावर सिनेमा आधारित आहे. या संघर्षात भारतीय जवानांनी हत्यारं नसताना केवळ लाठ्या काठ्यांचा वापर करुन चीनशी दोन हात केले होते. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीझर आला. टीझरमधील सलमान खानचे हावभाव पाहून त्याच्यावर चांगलीच टीका झाली. सलमानचे एक्सप्रेशन शत्रूशी युद्ध करतानाचे नाही तर रोमँटिक दिसत आहेत असं नेटकरी म्हणाले.  आता या ट्रोलिंगवर सलमानने उत्तर दिलं आहे.

सलमान खान नुकताच ISPL सीझन ३ च्या इव्हेंटसाठी आला होता. यावेळी मोहम्मद कैफ यांनी सलमानशी गप्पा मारल्या. त्यांनी सलमानला गलवानच्या टीझरमधला तो सीन बॅट हातात घेऊन पुन्हा एकदा रिक्रिएट करायला सांगितला. यावर सलमानने हातात बॅट घेतली आणि  तो म्हणाला, 'कोणाला हे समजतं का ही हा रोमँटिक लूक आहे. पण भाऊ मी कर्नल आहे. हा तर कर्नलचा लूक आहे ज्याला माहितीये की आपल्या सहकाऱ्यांना आपल्या टीमला कसं प्रोत्साहित करायचं आहे...तसाच लूक मी प्रेक्षकांनाही देऊ शकतो. त्या लूकचा काहीच अर्थ नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच चालत आलंय आणि चालत राहील. 

सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' टीझरला युट्यूबवर २३ मिलियन व्ह्यूज मिळाले. या सिनेमाकडून सलमानला आणि त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. अपूर्व लखिया यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमात चित्रांगदा सिंहची सलमानसोबत जोडी आहे. १७ एप्रिल रोजी 'बॅटल ऑफ गलवान' रिलीज होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan responds to trolls of 'Battle of Galwan' teaser.

Web Summary : Salman Khan addresses criticism of his 'Battle of Galwan' teaser, defending his portrayal of a colonel. He states it's a look of encouragement, dismissing the romantic interpretations.
टॅग्स :सलमान खानबॉलिवूडट्रोल