Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या 'फाटलेल्या' बुटांची सोशल मीडियावर चर्चा! एका जोडीची किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:56 IST

सलमान खान हा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याची मुलाखतीतील वक्तव्ये चर्चेत असतात, तर काही वेळा त्याचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.  नुकताच सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या 'फाटलेल्या' बुटांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान चेकर्ड शर्ट आणि काळ्या गॉगलमध्ये डॅशिंग दिसत आहे. मात्र, तो गाडीतून उतरताच कॅमेरे त्याच्या बुटांकडे वळले, जे पुढच्या बाजूने फाटलेले दिसत होते. वृत्तानुसार, सलमानला हे  बूट त्याला त्याचे वडील सलीम खान यांनी अनेक वर्षांपूर्वी भेट दिले होते, जे तो आजही जपून वापरतो.

'टायगर ३' दरम्यानही झाली होती चर्चायापूर्वी 'टायगर ३' च्या प्रमोशनवेळीही सलमान अशाच फाटलेल्या बुटांमध्ये दिसला होता. त्यावेळीही पत्रकारांनी खुलासा केला होता की, ते बूट फाटलेले नसून एका महागड्या ब्रँडची 'स्टाईल' होती. हे बूट 'डिस्ट्रेस्ड लूक' (Distressed Look) या फॅशन प्रकारातील आहेत. आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्स मुद्दामहून फाटलेले किंवा जुने दिसतील असे बूट तयार करतात, ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan's 'torn' shoes spark social media buzz.

Web Summary : Salman Khan's torn shoes went viral, sparking discussion. The shoes, gifted by his father, are a 'distressed look' fashion item. Similar shoes cost millions. He was previously seen in similar shoes during 'Tiger 3' promotions.
टॅग्स :सलमान खान